मॅथेक्स परीक्षेत पंकज माध्यमिक विद्यालयाच्या 7 विद्यार्थ्यांचे सुयश

 मॅथेक्स परीक्षेत पंकज माध्यमिक विद्यालयाच्या 7 विद्यार्थ्यांचे सुयश

चोपडा दि.१९(प्रतिनिधी)- महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ आयोजित गणित   प्राविण्य परीक्षेत  चोपडा येथील पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता 8 वीच्या विद्यार्थ्यांनी मॅथेक्स परीक्षेत नेत्रदीपकयश मिळवून दुसऱ्या लेव्हल साठी पात्र ठरले आहेत.

 महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ दरवर्षी इयत्ता 5 वी , इयत्ता 8 वी व इयत्ता 10 वी साठी गणितात आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने गणित प्राविण्य व गणित प्रज्ञा अशा विविध स्पर्धा परीक्षा आयोजित करत असते. या वर्षी संपन्न झालेल्या गणित प्राविण्य परीक्षेत पंकज माध्यमिक व उच्च विद्यालयाच्या इयत्ता 8 वी च्या 7 विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत दुसऱ्या लेव्हल साठी पात्र झाले आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये कार्तिक प्रमोद पाटील, हितेश महेंद्र पाटील, तनिष गुरुदास पाटील, तेजस जितेंद्र पाटील, संस्कार शरद शिरसाठ, हर्ष लीलाधर पाटील,तन्मय संदीप पवार याचा समावेश आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना गणित शिक्षक वैशाली पाटील , पी सी पाटील, पी जे पाटील व मुख्याध्यापक व्ही आर पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. जळगाव जिल्ह्यात सुयश मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थाध्यक्ष पंकजभैया बोरोले, संस्थापक अध्यक्ष डॉ सुरेश पंडित बोरोले , उपाध्यक्ष अविनाश राणे, सचिव गोकुळ भोळे, संचालक नारायणदादा बोरोले, मुख्याध्यापक व्ही आर पाटील, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने