मजरेहोळ येथे साईबाबा मंदिराचा 25वा वर्धापनदिनानिमित्त भव्य सोहळा


 मजरेहोळ येथे साईबाबा मंदिराचा 25वा वर्धापनदिनानिमित्त भव्य सोहळा


चोपडादि.१९(प्रतिनिधी):-चोपडा तालुक्यातील प्रति शिर्डी समजल्या जाणाऱ्या मजरेहोळ येथील साई बाबांच्या मंदिराचा 25वा वर्धापनदिन (रौप्य महोत्सव) दिनांक 21 व 22फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरा होत असल्याने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेआहेत.

दिनांक 21रोजी मजरेहोळ येथे संध्याकाळी पाच वाजेला भव्य अशी शोभायात्रा व पायीदिंडी निघणार आहे.तर 22फेब्रुवारी रोजी सकाळी 10वाजेला श्री सत्यनारायणाची महापुजा आणि साई भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. साईबाबांच्या त्याच दिवशी रात्री ८:०० वाजता कीर्तनकार कीर्तन केसरी ह.भ.प.विशालजी महाराज खोले(मुक्ताईनगर)यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे .

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अरुणभाई गुजराथी(माजी विधानसभा अध्यक्ष) महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री ना.गुलाबरावजी पाटील , आमदार प्रा.चंद्रकांतजी सोनवणे,चोपडा नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.नम्रता सचिन पाटील,आणि नगरसेवक पियुष चौधरी यांची खास उपस्थिती लाभणार आहे. भाविकांनी महाप्रसादाचा लाभ तरी तालुक्यातील साईभक्तांनी जास्तीतजास्त मोठ्या संख्येने महाप्रसादाचा व कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन साई ग्रामस्थ मित्रमंडळ यांच्या वतीने करण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने