छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त वाळकी येथे रक्तदान शिबिरात १६ बॅग रक्त संकलन; रक्तदात्यांचा सन्मान

 छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त वाळकी येथे रक्तदान शिबिरात १६ बॅग रक्त संकलन; रक्तदात्यांचा सन्मान


घोडगाव,ता.चोपडा दि.१९(प्रतिनिधी): येथून जवळच असलेल्या वाळकी  येथील सौ. शांताबाई भास्करराव पाटील माध्यमिक विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये एकूण १६ बॅग रक्त संकलन करण्यात आले.

या रक्तदान शिबिराचे आयोजन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुवर्णा श्रीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाला रेड क्रॉस सोसायटीचे मेडिकल ऑफिसर डॉ. शंकरलाल सोनावणे, रेड क्रॉस सोसायटीचे तालुका अध्यक्ष श्री. नितिन अहिरराव, रेड क्रॉस सोसायटीचे सदस्य श्री. राज मोहम्मद यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच रेड क्रॉस सोसायटी, जळगाव व रेड क्रॉस सोसायटी, चोपडा येथील टेक्निशियन टीमने रक्तसंकलनाची जबाबदारी अत्यंत सुरक्षित व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडली.

या शिबिरास विद्यालयातील शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, गावकरी तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून उपक्रम यशस्वी केला. रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांना त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबवून त्यांना खऱ्या अर्थाने अभिवादन करण्यात आल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.या यशस्वी उपक्रमाबद्दल विद्यालय प्रशासनाच्या वतीने सर्व रक्तदाते, रेड क्रॉस सोसायटीचे पदाधिकारी, वैद्यकीय पथक तसेच सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने