अडावदला महाशिवरात्रीनिमित्त प्रजापिता ब्रह्मकुमारी केंद्रातर्फे अमरनाथ गुफाचे दर्शन

 अडावदला महाशिवरात्रीनिमित्त प्रजापिता ब्रह्मकुमारी केंद्रातर्फे अमरनाथ गुफाचे दर्शन





अडावद,दि.15(प्रतिनिधी) येथे प्रजापिता ब्रह्मकुमारी  ईश्वरिय विश्व विद्यालयात महाशिवरात्रीचे पावन  मुहूर्तावर  भव्य अमरनाथ गुफाचे दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

देशभर  महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात  या दिवसाचे पारमार्थिक महत्व लक्षात घेत प्रजापिता ब्रह्मकुमारी केंद्रातर्फे भव्य अमरनाथ गुफाचे दर्शन व्हावे म्हणून विशेष देखावा करून भगवान भोले बाबांचे दर्शन भक्तांसाठी खुले केले होते . यावेळी बाबा अमरनाथ (बाबा बर्फानी ) यांचे दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी उसळली.तसेच ब्रम्ह कुमारी सेंटरला विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येऊन हर हर महादेव यांचा घोषणांनी वातावरण सर्व शिवमय झाले .या गुफेच राहस्य ब्रह्मकुमारी सेंटरचे प्रमुख कु. संगीता दिदी यांनी भाविकांना समजून सांगितले.जवळच असलेले हरेश्वर मंदिर येथे बाबा हरेश्वराचे दर्शन शेकडो भाविकांनी घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने