प्राथमिक शिक्षक संघाच्या जळगांव जिल्हाध्यक्षपदी जामनेर येथील संदीप पाटील यांची तर सरचिटणीस पदी चोपड्याचे योगेश सनेर यांची निवड
चोपडा दि.१५(प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या जळगांव जिल्हाध्यक्षपदी जामनेर येथील संदीप पाटील यांची तर सरचिटणीस पदी चोपड्याचे योगेश सनेर यांची आणि मार्गदर्शक नेतेपदी अमळनेरचे वाल्मिक पाटील* यांची काल दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष श्री केशवराव जाधव , शिक्षक नेते माधराव पाटील, राज्य पदाधिकारी श्री. पुस्तके सर यांनी जाहीर केली आहे.
राज्यमध्यवर्ती संघटनेमार्फत TET प्रश्नावर एकसंघ होण्यासाठी अजिंठा विश्रामगृह जळगाव येथे भेट दिली. त्यावेळी त्यांनी येत्या दिनांक ५ मार्च ते ७ मार्च २०२६ दरम्यान शिवाजी पार्क मुंबई येथे मुख्यमंत्री , ग्रामविकास मंत्री शिक्षण मंत्री , शिक्षण राज्यमंत्री यांच्यासह विविध सन्माननीय प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या शिक्षक महामंडळ सभेला शिक्षक प्रश्नांसाठी सर्व संघटनांनी एकत्र येऊन उपस्थित राहण्याबाबत आवाहन केले..
यात शिक्षकांसाठीची TET परीक्षा रद्द झाली पाहिजे.किंवा त्यासाठी किमान गुणांची अट असली पाहिजे सोबतच, जुनी पेन्शन सह इतर विविध मागण्यासाठी शिक्षक प्रश्नाला एकजुटीने वाचा फोडण्यात येणार आहे.
यावेळी जळगाव जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाला पुन्हा नव्या उमेदीने बळ देण्यासाठी प्राथमिक शिक्षक संघाची धुरा नवीन तडफदार, युवा नेतृत्व शिक्षक प्रश्नाला वाचा फोडणारे श्री संदीप जगन्नाथ पाटील यांच्याकडे देण्याची एक मुखाने मागणी झाली, शिक्षक प्रश्नासाठी काम करणारे अभ्यासू व्यक्तिमत्व श्री. योगेशदादा सनेर यांनी पुन्हा प्राथमिक शिक्षण संघात कामकाज करावे अशी मागणी झाली. म्हणून राज्याध्यक्ष श्री केशवराव जाधव यांनी जळगाव जिल्हा अध्यक्षपदाची धुरा श्री. संदीप पाटील, सरचिटणीस पदाची धुरा श्री. योगेश सनेर यांच्याकडे तर श्री. वाल्मिक मराठे यांनी जिल्ह्याचे मार्गदर्शन करावे असे लेखी पत्रांद्वारे कार्यभार सोपविला.
त्यांच्या मनोगतातून जळगाव जिल्ह्याला स्वर्गीय हनुमंतरावजी पवार यांच्या कर्तुत्वाचा वारसा लाभलेला आहे, ज्याप्रमाणे माजी जिल्हाध्यक्ष यांनी तो सक्षमपणे चालविला, त्याप्रमाणे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष व सरचिटणीस यांनी नवनियुक्त कार्यकारणी गठीत करून प्राथमिक शिक्षक संघाच्या रूपाने शिक्षक प्रश्नांना वाचा फोडून सर्व प्राथमिक शिक्षकांना न्याय देतील व प्राथमिक शिक्षण संघाला जिल्ह्यात गतवैभव प्राप्त करून देतील असा ठाम विश्वास व्यक्त केला.
यावेळी मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष राम पवार प्राथमिक संघाचे राज्य उपाध्यक्ष श्री. किरण मधूकर पाटील ,श्री. वाल्मीक मराठे यांच्यासह पदवीधर संघटनेचे डॉ.श्री विजय बागुल सर, शिक्षक परिषदेचे श्री सलीम शेख , शिक्षक भारतीय संघटनेचे श्री सोमनाथ पाटील , श्री. अजय पाटील ,शिक्षक सेनेचे श्री.नाना पाटील ,जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. गोविंदा ठाकरे सोबत सरचिटणीस श्री. विपिन पाटील तालुकाध्यक्ष श्री. मुकेश पाटील,ग.स.सोसायटीचे संचालक श्री. मंगेश भोईटे , श्री. योगेश सनेर तसेच भुसावळ पतपेढी संचालक श्री.किरण पाटील, श्री. अनिल वना पाटील, श्री. कल्पेश चौधरी, प्राथमिक शिक्षक पेढीचे संचालक श्री. राकेश पाटील यांच्या सोबत श्री.कैलास पाटील ,श्री. अभिजीत साळुंखे,श्री. सुनील बोरसे , श्री. विवेक मोरे ,श्री. स्वप्नील महाजन ,श्री .प्रशांत गांगुर्डे,श्री. नारायण लोहार, श्री. जी.बी. चौधरी , श्री. महेश वाणी * यांच्यासह अनेक शिक्षक बांधव उपस्थित होते.
