दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स विभागातर्फे विज्ञान सप्ताह निमित्ताने नाविण्यपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन
चोपडा,दि.१५(प्रतिनिधी): येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स विभागातर्फे विज्ञान सप्ताह निमित्ताने नाविण्यपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधन वृत्ती व नवकल्पनांना प्रोत्साहन देणे हा आहे.
या कार्यक्रमामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ष पदवीच्या विद्यार्थी सहभाग नोंदवणार आहेत. या विज्ञान सप्ताहामध्ये विद्यार्थी विविध नवीन प्रकल्प, वैज्ञानिक मॉडेल्स व तांत्रिक संकल्पना सादर करणार आहेत . या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आपल्या कल्पना सादर करण्यासाठी उत्तम व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. के. एन. सोनवणे सर, उपप्राचार्य डॉ. आर. एम. बागुल सर , उपप्राचार्य प्रा.डॉ. ए. बी . सुर्यवंशी व समन्वयक डॉ. शैलेश वाघ यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करून प्रोत्साहन दिले. इलेक्ट्रॉनिक्स विभागप्रमुख डॉ. के. डी. गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करून विद्यार्थ्यांना विज्ञान दिनाचे महत्त्व समजावले तसेच डॉ. एल. बी. पटले यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
यावेळी ESA (Electronics Students Association) च्या विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वी पार पडला.या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड वाढणार असून भविष्यातील तांत्रिक कौशल्य विकासासाठी हा उपक्रम निश्चितच उपयुक्त ठरणार आहे . या कार्यक्रमाला पुनम गाडगीळ व शितल कुमावत व धीरज राठोड , महेश जोशी यांनी मोलाचे सहकार्य केले. या प्रसंगी ऑनलाईन प्रश्न मंजूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेच्या आयोजनासाठी पुजा, कांचन , पवन व सिद्धार्थ यांनी मेहनत घेतली.
