मागासवर्गीय प्राध्यापक संघटनेचे राज्यपालांना निवेदन

 मागासवर्गीय प्राध्यापक संघटनेचे राज्यपालांना निवेदन 


  चोपडा दि.15(प्रतिनिधी)उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ स्तरीय आणि महाविद्यालयीन मागासवर्गीय प्राध्यापक संघटनेने समाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांच्या नियमित ऑनलाईन वेतन होण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल ., नामदार मुख्यमंत्री , नामदार उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री , संचालक , उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग पुणे., सहसंचालक , उच्च आणि तंत्रशिक्षण, जळगाव विभाग, जळगाव. यांना निवेदन सादर केले.

           फेब्रुवारी 2024 पासून राज्यभरातील सर्व समाजकार्य महाविद्यालयात समाज कल्याण विभागाकडून उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाकडे हस्तांतरित करण्यात आलेली आहेत. पण असे असले तरी समाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या आजही बाकी आहेत. नियमित ऑनलाईन वेतन ही त्यातली एक प्रमुख समस्या आहे. समाजकार्य महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांचा एच टी इ या सेवार्थ प्रणाली मध्ये अद्याप समावेश करण्यात आलेला नाही. शासन स्तरावरून डी डी ओ असिस्टंट कोड निर्माण झाल्याशिवाय एच टी इ सेवार्थ प्रणाली मध्ये कर्मचाऱ्यांची नावे समावेशित होणे शक्य होत नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनाला विलंब होतो. शासन स्तरावरून लवकरात लवकर डीडीओ असिस्टंट कोड निर्माण करून कर्मचाऱ्यांची एच टी इ सेवार्थ प्रणाली अद्यावत करण्यात यावी म्हणजे कर्मचाऱ्यांना त्यांच्या न्याय हक्काचे वेतन प्रत्येक महिन्याला वेळेवर मिळू शकेल याच मागणीकरिता निवेदन देण्यात आलेले आहे. निवेदनावर संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष प्रा.डॉ. जयवंत मगर, केंद्रीय सचिव प्रा.डॉ. अनिल हिवाळे, जळगाव जिल्हा अध्यक्ष (प.वि.) प्रा.डॉ. राहुल निकम यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

    या पूर्वी देखील मागासवर्गीय प्राध्यापक संघटनेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या नियमित वेतनाचा प्रश्न, वेतन पडताळणी प्रश्न, पदोन्नतीचा प्रश्न आणि अन्य प्रश्नासंदर्भात प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. यातली काही प्रश्न सुटले असून काही मात्र अद्याप तसेच आहेत. हे प्रश्न न सुटल्यास लवकरच राज्यपाल महोदय तथा मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात येईल असे मागासवर्गीय संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने