मामलदे शिवारात चिया पीक काढणीवर प्रयोगशील शेतकरी प्रवीण पाटील यांचा प्रयोग

 मामलदे शिवारात चिया पीक काढणीवर प्रयोगशील शेतकरी प्रवीण पाटील यांचा प्रयोग 


गणपूर,ता. चोपडा दि. 21(प्रतिनिधी):
मामलदे ता. चोपडा येथील प्रयोगशील शेतकरी  प्रविण मधुकर पाटील यांनी आपल्या शेतात 'चिया सीड्स'ची (Chia Seeds) लागवड करून एक यशस्वी आणि नाविन्यपूर्ण प्रयोग केला आहे. पारंपारिक पिकांना फाटा देत त्यांनी घेतलेल्या या धाडसी निर्णयाचे सध्या सर्वत्र कौतुक होत असून हे पीक येत्या पंधरवाड्यात काढणीवर येत आहे.

पाटील यांना एक चक्र शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या वतीने हे बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यासाठी रोहन पाटील यांचेही त्यांना सहकार्य मिळाले.

नुकतीच तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंखे यांनी या प्लॉट ची पाहणी केली.यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी दीपक पाटील,भरत इंगळे, भाऊसाहेब पाटील उपस्थित होते. या पिकाला इतर नगदी पिकांच्या तुलनेत खूप कमी पाण्याची आवश्यकता असते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चिया सीड्सला मोठी मागणी असल्याने शेतकऱ्यांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. ओमेगा-३ फॅटी ॲसिड आणि फायबरचा उत्तम स्रोत असल्याने याला 'सुपरफूड' मानले जाते.


-++++++++चौकट++++++

​कमी पाण्यात आणि कमी खर्चात येणारे हे पीक खान्देशातील हवामानातही उत्तमरित्या येऊ शकते, हे पाटील यांनी केलेल्या प्रयोगातून सिद्ध झाले आहे.त्यासाठी कृषी विभागाचेही त्यांना मोलाचे सहकार्य मिळत असल्याचे पाटील यांनी सांगितले.​ 

शेतकऱ्यांनी आता बाजारपेठेचा कल ओळखून अशा नगदी आणि औषधी पिकांकडे वळणे काळाची गरज आहे.चिया बिया हे त्यापैकीच एक पीक आहे....

            *दीपक साळुंखे..तालुका कृषी अधिकारी,चोपडा* 

++++++++++++++++++


 *फोटो कॅफ्शन...मामलदे* ,ता चोपडा)चिया पिकाची पाहणी करतांना तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंखे,उत्पादक प्रवीण पाटील व शेतकरी

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने