अडावद येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी
अडावद,ता.चोपडादि.२१( प्रतिनिधी): येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. यावेळी विद्यार्थ्यांनी नृत्य, गीत, भाषणे सादर करून शिवभक्तांना त्यांच्या जीवनातील प्रेरक गोष्टी सांगितल्यात.
सकाळी १० वाजता विघ्नहर्ता चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करीत पुतळ्यास माल्यार्पण करून करीत आरती करण्यात आली.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम पाटील, जिल्हा परिषद शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक शांताराम पवार यांनी महाराजांच्या जीवनावर भाषण केले. शालेय विद्यार्थ्यांनी पाळणा, गीते यांवर नृत्य सादर केली. तसेच काही महाराजांच्या जीवनातील प्रेरक प्रसंग कथन करीत आजच्या परिस्थितीत त्यांची कशी आवश्यकता आहे याबाबत विविध उदाहरणे देऊन श्रोत्यांच्या मनाला भिडणारे भाषणे केलीत.
या कार्यक्रमास सरपंच बबनखा तडवी, माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम पाटील, माजी उपसरपंच व चोसाका संचालक दिनकर देशमुख, माजी विकासो चेअरमन वसंत धनगर, माजी सभापती कामधेनू दुग्धोत्पादक संस्था संजय पाटील,माजी विकासो संचालक श्रीकांत दहाड,माजी उपसरपंच हनुमान महाजन, राजेश देशमुख, चंद्रकांत पाटील, माजी पीक संरक्षण संस्थेचे चेअरमन लक्ष्मण महाजन, व्यापारी सुनील सारस्वत, माजी विकासो चेअरमन अनिल देशमुख, माजी विकासो चेअरमन सचिन महाजन, माजी चोसाका संचालक राजेश देशमुख, विकासो संचालक प्रकाश महाजन, वडगावचे माजी सरपंच नामदेव पाटील, मितावलीचे ग्राम पंचायत सदस्य मंगल इंगळे, ग्रामपंचायत सदस्य पंकज महाजन, ग्राम पंचायत सदस्य तुषार देशमुख, ग्रामधिकारी प्रमोद सैंदाने, कामधेनू दुग्धोत्पादक संस्थेचे सभापती राजेंद्र पाटील, माजी सभापती नीलेश देशमुख प्रा. लक्ष्मण पाटील, हरिश पाटील, टिंगू देशमुख, निलेश देशमुख, चंद्रकांत महाजन, जिल्हा परिषद शिक्षक खंडेराव देशमुख, प्रमोद देशमुख, विकासो चेअरमन भूषण देशमुख, डॉ. नेवे, ग्रामपंचायत सदस्य पारधी, गणेश खजुरे ग्रामपंचायतचे लिपीक पुरुषोत्तम महाजन, रफिक मण्यार, पि. आर. माळी आदींसह शेकडो शिवप्रेमी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रा. लक्ष्मण पाटील यांनी व्यक्त केले.
