चोपडा महाविद्यालयात राष्ट्रीय स्तरावरील 'ऑनलाईन फिजिक्स क्विझ' संपन्न..४२८ विद्यार्थ्यांचा सहभाग

 चोपडा महाविद्यालयात राष्ट्रीय स्तरावरील 'ऑनलाईन फिजिक्स क्विझ' संपन्न..४२८ विद्यार्थ्यांचा सहभाग


चोपडा,दि.२१(प्रतिनिधी): येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे  दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील महाविद्यालयातील भौतिकशास्त्र  विभागाच्या वतीने  राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाईन फिजिक्स क्विझ स्पर्धेचे आयोजन  करण्यात आले होते.या स्पर्धेत देशभरातील विविध राज्यांमधून एकूण ४२८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

     या कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे अध्यक्ष  ॲड. संदीप सुरेश पाटील आणि सचिव  डॉ. सौ.स्मिता संदीप पाटील यांच्या हस्ते फीत कापून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. याप्रसंगी प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे, उपप्राचार्य प्रा. डॉ. आर. एम. बागुल, भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. पी. एम. रावतोळे, आणि समन्वयक डॉ. व्ही. आर. हुसे यांची प्रमुख उपस्थिती होती.ही स्पर्धा 'मेंटीमीटर' सॉफ्टवेअरच्या माध्यमातून घेण्यात आली. यामध्ये इयत्ता ११ वी व १२ वीच्या अभ्यासक्रमावर आधारित एकूण ८० प्रश्न विचारण्यात आले होते. प्रत्येक प्रश्नासाठी ४५ सेकंदांचा वेळ देण्यात आला होता. अचूक उत्तर लवकरात लवकर देणाऱ्या विद्यार्थ्याला अधिक गुण अशा स्वरूपाची ही स्पर्धा होती. स्पर्धे दरम्यान १, १०, २५, ५०, ७०, ७५ आणि ७९ व्या प्रश्नानंतर 'लीडरबोर्ड' प्रदर्शित करून विद्यार्थ्यांची क्रमवारी दाखवण्यात येत होती, ज्यामुळे स्पर्धेत मोठी चुरस निर्माण झाली होती.८० प्रश्नांनंतर अंतिम निकाल जाहीर करण्यात आला, तो त्यात प्रथम क्रमांक (५०००/- रुपये व स्मृतीचिन्ह): मकरंद रवींद्र पाटील (SSBT इंजिनिअरिंग कॉलेज, बांभोरी), द्वितीय क्रमांक (३०००/- रुपये व स्मृतीचिन्ह): नम्रता शांताराम पाटील (SSBT इंजिनिअरिंग कॉलेज, बांभोरी), तृतीय क्रमांक (२०००/- रुपये व स्मृतीचिन्ह): वरद महेश पवार (विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल, चोपडा), उत्तेजनार्थ पारितोषिक (प्रत्येकी १०००/- रुपये): सिद्धेश्वरी राहुल शिरसाठ (चांदवड पॉलिटेक्निक) आणि आयुष मिश्रा (लखनौ विद्यापीठ) या विद्यार्थ्यांनी प्राप्त केली.

  या स्पर्धेचे विभागप्रमुख डॉ. पी. एम. रावतोळे यांनी आयोजक म्हणून काम पाहिले तर प्रास्ताविक व समन्वय डॉ. विष्णू आर. हुसे यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी सिद्धी नेवे हिने केले आणि आभार प्रदर्शन  निरंजन पाटील यांनी मानले.

   सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी  दर्शन एन. पाटील,  निरंजन एन. पाटील,  धनंजय आर. पाटील,  गोपाळ वाघ,  जितेन धोबी आणि भौतिकशास्त्र विभागातील सर्व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञान वाढवण्यासाठी आणि विज्ञानाची गोडी निर्माण करण्यासाठी ही स्पर्धा अत्यंत उपयुक्त ठरली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने