पंकज माध्यमिक विद्यालयात छत्रपती शिवजयंती निमित्त इतिहास जागृकता उपक्रम
चोपडा दि.२१(प्रतिनिधी)पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ढोल ताशांच्या गजरात आणि शिवकालीन विविध वेशभूषेत उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक .व्हि. आर. पाटील यांनी शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने झाली. याप्रसंगी विजया पाटील यांनी यांनी शिवरायांच्या शौर्य, पराक्रम व स्वराज्य स्थापनेविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केले आणि इतिहास बाबत जागृतता केली. कार्यक्रम साठी विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह दिसत होता, ढोल ताशांच्या गजरात जणू काही शिवकालीन युगात गेल्याच भास निर्माण झाला मानव पगार व स्वप्नील पाटील या विद्यार्थ्यांनी स्फुर्तीदायक गीत गायन केले वातावरण शिवमय केले. पंकजा पाटील, देवयानी पाटील, मृणाली वळवी या विद्यार्थिनींही झुलवा पाळणा या गीतावर उत्कृष्ट नृत्य सादर करत उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या. रिद्धी गोसावी, लावण्या माळी, माहेश्वरी नाथबुवा, दिक्षा पाटील, ऋतुजा देसले व विद्या बारेला, नंदिनी पाटील, अश्विनी अत्तरदे, यांनीही उत्कृष्ट समूह नृत्य सादर केले. तसेच विरेन पाटील, उत्कर्ष धनगर पार्थ दाभाडे, दक्षराज पाटील, हर्षल पाटील, आदित्य बाविस्कर पार्थ परदेशी, आयुष रायसिंग, दुर्गेश पाटील, लोकेश पाटील या विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या जीवनावर आधारीत छावा नाटिका सादर करतांना अंगावर शहारे आले. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या जीवनावर आपले विचार मांडले. तसेच देशभक्तीपर गीते, पोवाडे आणि लेझीम नृत्य सादर करून वातावरण शिवप्रेमाने भारावून गेले. असंख्य विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या , मावळे , जिजाऊ , वेशभूषेत येऊन त्यांच्या पराक्रमाची झलक दाखवली.
या कार्यक्रमातून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील इतिहास जागृततेला चालना मिळाली. निर्माण केली विद्यार्थ्यांना शिवरायांचे धैर्य, नेतृत्वगुण आणि स्वाभिमान यांचा आदर्श घेण्याची प्रेरणा मिळाली. संपूर्ण शालेय परिसर "छत्रपती शिवाजी महाराज की जय" या घोषणांनी दुमदुमला.
युक्ती अतुल महाजन व वैष्णवी भिमराव पाटील या विद्यार्थिनींनी सूत्रसंचालन केले. तर पौर्णिमा भादले, वैशाली पाटील , बाजीराव तायडे, जयेश मंडपे, अविनाश पाटील, दिपक सोनवणे व सर्व शिक्षक आणि कर्मचारी वृंदांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
