श्याम उपद्देशी मंडळाचे कार्यकर्ते रिद्धपूर यात्रेसाठी मार्गस्थ

 श्याम उपद्देशी मंडळाचे कार्यकर्ते रिद्धपूर यात्रेसाठी मार्गस्थ


गणपूर ,ता. चोपडा) दि. 26(प्रतिनिधी): येथील श्याम उपदेशी मंडळाचे कार्यकर्ते व महानुभाव पंथीय उपदेशी बांधव नुकतेच पदयात्रेने रिद्धपुर येथील यात्रेसाठी पदयात्रा करत रवाना झाले.येथील उपदेशी बांधव दरवर्षी विविध स्थळांसाठी पदयात्रा करत असतात

यावेळी त्यांना येथील दत्त मंदिरातून शुभेच्छा देत उपद्देशी बांधवांनी निरोप दिला. या पदयात्रेत 19 भाविक सहभागी झाले आहेत.विविध टप्पे पार करत व रस्त्यालगतच्या स्थळांना भेटी देऊन दर्शन घेत ते पाच मार्च रोजी  अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे पोहोचणार आहेत. बारा ते तेरा दिवस पदयात्रा करत ते पोहचतील.या पदयात्रेत बापूराव पाटील,विलास पाटील,बाबूलाल भावसार,संजय पाटील,वाल्मीक पाटील,गणेश पाटील,सोनू पाटील, यांच्यासह श्याम उपदेशी मंगळाचे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने