चोपड्यात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या मयताच्या खिश्यात चिठ्ठी आढळून आल्याने खळबळ
छायाचित्र:-मयत योगेश सुनील चौधरी व खिशात आढळून आलेली सुसाईड नोटचोपडा,दि.२६(प्रतिनिधी)शहरातील लोहिया नगर भागातील 25 वर्षे युवकाने सावकाराच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दूर्देवी घटना घडली. मयताच्या खिशात सुसाईड नोट सापडल्याने आणखीनच घटनेचे गुढ वाढले आहे.
शहरातील लोहिया नगरमधील रहिवासी असलेल्या योगेश सुनील चौधरी (वय २५) या युवकाने सावकाराच्या जाचाला कंटाळून आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मयत योगेशच्या खिश्यात चिठ्ठी सापडली असून तिच्यात पैशांचे तगाद्याला कंटाळून गळफास घेतल्याचे म्हटले आहे. त्यात पिंटू नामक व्यक्ती पैशांसाठी सतत तगादा लावत असल्याने मी आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला आहे.सदरील
व्यक्तीकडून १० हजार रुपये घेतले होते. त्या पोटी त्याने दोन लाख रुपये व्याज पिंटूला दिलेआहे तरी तो पैश्यांसाठी पुन्हा पुन्हा तगादा लावत होता. त्यात त्याने मयत योगेशला धमकी देऊन मारहाण केली होती. तसेच त्याच्या आई, वडिलांना ही शिवीगाळ केली होती. या सर्व गोष्टींना कंटाळून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख योगेशने चिठ्ठीमध्ये केला आहे. पिंटू या व्यक्तीला पोलिसांनी कडक शिक्षा करावी, अशी विनंतीही त्याने चिठ्ठीत केली आहे. योगेशचे कुटुंब अतिशय हलाखीच्या परिस्थितीत आपला उदरनिर्वाह करीत आहे. मयत योगेश चौधरी याच्या पश्चात आई, वडील,असा परिवार आहे.मयत योगेश चौधरी हा हातमजुरी करत होता. अत्यंत हलाखीची परिस्थितीत तो आपला उदार निर्वाह करत होता. त्याचा परिवार देखील मोलमजुरी करून जीवन चरितार्थ चालवितात अशी माहिती परिसरातील मित्र मंडळी व नातेवाईकांनी दिली.
दरम्यान या घटनेची शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.पोनि मधुकर साळवे यांनी मयताच्या खिशात चिठ्ठी आढळून आली असून पैशांचा उल्लेख असल्याच्या माहितीस दुजोरा दिला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
