लासूर येथे श्री संत तुकाराम महाराज बिजोत्सवानिमित्त कीर्तन सप्ताहाचे आयोजन

 लासूर येथे श्री संत तुकाराम महाराज बिजोत्सवानिमित्त कीर्तन सप्ताहाचे आयोजन

लासूर ता‌.चोपडा (वार्ताहर) येथे सालाबादाप्रमाणे यावर्षी देखिल जगतगुरु संत श्री तुकाराम महाराज बिज महोत्सवानिमित्त अखंड ज्योत किर्तनी सप्ताहाचे आयोजन दि 26 फेब्रुवारी पासून करण्यात आले असून यात आठ दिवस नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन होणार असून दररोज सकाळी 5ते6 वाजेपर्यंत काकड आरती तसेच सायंकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत हरीपाठ होणार असून दररोज रात्री 8/30 ते 10/30 कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे दि 26/2/2026 रोजी ह‌.भ प‌.वैष्णवीताई‌ महाराज कान्हेरी गवळी(अकोला),दि 27/2/2026 रोजी ह‌.भ‌.प‌.पांडूरंग‌ महाराज मालपूरकर,दि‌ 28/2/2026 रोजी ह‌.भ‌.प‌.खुशाल‌ महाराज म्हाळसे पिंपळगाव,दि‌1/3/2.026 रोजी ह‌भ‌.प‌.गोविंद‌ महाराज कुरंगीकर,दि 2/3/2026 रोजी ह‌.भ‌.प‌.सुशिल‌ महाराज विटनेरकर,दि 3/3/2026 रोजी ह‌.भ‌.प‌.इंद्रायणीताई‌ महाराज मालेगाव,दि‌4/3/2026 रोजी ह‌.भ‌.प‌.गजानन‌ महाराज चौगावकर यांचे किर्तन होणार असून दि 5/3/2026 रोजी ह‌.भ‌.प‌.भगवान‌ महाराज मालपूरकर यांच्या काल्याचा कीर्तनाने कीर्तनी सप्ताहाचा समारोप होणार असून या कीर्तनी सप्ताहाला येथिल श्रीराम भजनी मंडळाचे सहकार्य लाभले असून तरी लासूर व परीसरातील भाविक बंधू भगिनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कीर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज बिजोत्सव व मराठा  समाज  बांधव लासूर यांनी केले आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने