बहुजन समाज पार्टीच्यावतीने मुख्याधिकारींना विविध मागण्यांचे निवेदन
चोपडा दि.25(प्रतिनिधी): बहुजन समाज पाटीॅच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन चोपडा नगर परिषद नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहे.
निवेदनातून केलेल्या मागण्या अशा ,चोपडा नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या बेघर अतिक्रमण धारकांना जमिनिचे पट्टे देऊन घरकुल मंजूर करण्यात यावे, छत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे हे जुनाट व जिर्न झाल्यासारखे असुन ते अर्धाकृती आहेत म्हणून ते नवीन सुसज्ज पूर्णाकृती पुतळे बसवण्यात यावे, कर्तव्यात दिरंगाई करण्याऱ्या कर्मचारी व अधिकारी यांची चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करावी, पाणी पुरवठा पुरेपुर होत नसलेल्या भागात चांगल्या प्रेशरने पाणी सोडण्याची तजवीज व्हावी, जेणेकरून कोणीही पाण्यापासुन अलिप्त राहणार नाही याची दखल घ्यावी, तसेच साहित्य सम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या सन्मानार्थ अर्धाकृती पुतळा बसवण्यात यावा , तसेच राष्ट्रपीता महात्मा ज्योतिबा फुले , लोकराजे छत्रपती शाहुजी महाराज, विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, साहित्य सम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे व बहुजन नायक कांशीरामजी या महापुरूषांचा व लोक नेत्यांच्या सन्मानारार्थी प्रवेशद्वार बांधण्यात यावेत, अशा विविध मागण्या केल्या आहेत. निवेदनावर जळगाव जिल्हा महासचिव सचिन अशोक बाविस्कर , संजय पीरा अहीरे, विजय धुडपू रुपवते, अनिल गोरख वाडे, के. के.गंगावणे, वंसत वाल्हे ,राहुल सिरसाट, सुकदेव कीसन बाविस्कर, इत्यादींच्या सह्या आहेत.
