समाजकार्य महाविद्यालयात पर्यावरणीय आव्हाने आणि सद्यस्थिती’ विषयावर राष्ट्रीय परिषद संपन्न
चोपडा दि.,७(प्रतिनिधी) दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी भगिनी मंडळ चोपडा संचलित, समाजकार्य महाविद्यालय चोपडा आणि कला व वाणिज्य महाविद्यालय चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने समाजकार्य महाविद्यालयात ‘पर्यावरणीय आव्हाने आणि सद्यस्थिती’ या विषयावर राष्ट्रीय परिषद संपन्न झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी होते. उद्घाटक म्हणून माननीय गौरव साळुंखे (भा.प्र.से., मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद कार्यालय, अलवर, राजस्थान) होते, परिषदेचे बीजभाषक म्हणून प्रा.डॉ. रमेश जारे (मा.संचालक,टाटा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, तुळजापूर) उपस्थित होते.प्रमुख अतिथी मान्यवर म्हणून मा.राजेंद्र नन्नवरे (व्यवस्थापन परिषद, क. ब.चौ.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव), मा.अमोल पाटील (जलसंधारण अधिकारी, कळवण,नाशिक), मा.प्रा.डॉ.जगदीश सोनवणे (अध्यक्ष,समाजकार्य अभ्यास मंडळ, क. ब.चौ. उ.म.वि., जळगाव), प्रतिष्ठित उद्योगपती आशिष भाई गुजराथी, भगिनी मंडळ शैक्षणिक संकुलाच्या अध्यक्षा सौ पुनम गुजराथी, उपाध्यक्षा सौ. छाया गुजराथी, सहसचिव सौ अश्विनी गुजराथी, प्रो. डॉ. विष्णू गुंजाळ, (प्राचार्य समाजकार्य महाविद्यालय मोराणे),समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य मा.डॉ.ईश्वर सौंदाणकर, उपप्राचार्य मा.डॉ.आशिष गुजराथी, कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य मा.डॉ.संजय चौधरी,पत्रकार मा.श्रीकांत नेवे, मा.शाम जाधव, मा.प्रवीण पाटील, मा.पंकज पाटील, मा.उमेश नगराळे, मा.विश्वास वाडे, मा.संदीप ओली, राष्ट्रीय परिषदेचे समन्वयक प्रा.डॉ. उत्तम सोनकांबळे,प्रा.डॉ. नारसिंग वळवी, प्रा.डॉ. संबोधी देशपांडे, भगिनी मंडळ संकुलातील सर्व विभागातील विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयातील प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी तसेच समाजकार्य महाविद्यालयातील बीएसडब्ल्यू व एम एस डब्ल्यू चे विद्यार्थी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मंचावरील मान्यवरांच्या शुभहस्ते संस्थेच्या माजी अध्यक्षा स्वर्गीय मा.डॉ. सुशीलाबेन शाह ऊर्फ जीजी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण, दीपप्रज्वलन तसेच पर्यावरण रक्षणाचा प्रतीकात्मक संदेश म्हणून कुंडीतील रोपांना मान्यवरांच्या शुभहस्ते जलार्पण व स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
एक दिवशी राष्ट्रीय परिषदेचे प्रास्ताविक प्राचार्य मा.डॉ. ईश्वर सौंदाणकर यांनी केले. पर्यावरणीय आव्हाने आणि सद्यस्थिती विषयी विवेचन केले. राष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून पर्यावरण आणि सामाजिक स्थिती याविषयी आढावा प्राप्त करण्याचे हेतूने सदरील परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे , तसेच सदरील परिषदे करिता राज्यातून तसेच देशभरातून ६३ संशोधकांनी संशोधन पेपर सादर केल्याचे नमूद केले. परिषदेचा उद्देश आणि पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी परिषदेची उपयुक्तता विशद केले.
कार्यक्रमाचे उद्घाटक मा.गौरव साळुंखे यांनी पर्यावरणात होणाऱ्या बदलामुळे निर्माण होणाऱ्या समस्या तसेच शासनाचे धोरण याविषयी सखोल असे विवेचन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा.राजेंद्र नन्नवरे यांनी सातपुडा पर्वत आणि पर्वतीय रांगा याविषयी विवेचन करत,अभयारण्य वन्यजीव व वनांचे महत्त्व या विषय विवेचन करताना वनसंरक्षणाच्या संदर्भातील विविध कायद्यासंदर्भात माहिती दिली.
मा.आशिषभाई गुजराथी यांनी पर्यावरण संवर्धनामध्ये सौर ऊर्जा,प्लास्टिक बंदी, आर्टिफिशल इंटेलिजंट आणि पर्यावरण संरक्षण याविषयी सखोल अशी माहिती दिली.
अध्यक्षीय भाषणात मा.अरूणभाई गुजराथी यांनी आंतरराष्ट्रीय तथा राष्ट्रीय स्तरावर तापमान वाढ, पाण्याचा साठा, जंगल तोडीची समस्या सारख्या समस्यांवर मात करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने पुढे येऊन वृक्ष संवर्धन आणि वातावरणीय समतोल राखण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे याविषयी विस्तृत असे विवेचन केले.
सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय परिषदेचे समन्वयक प्रा.डॉ. उत्तम सोनकांबळे आणि प्रा.डॉ. संबोधी देशपांडे व आभार प्रदर्शन प्रा.डॉ. नारसिंग वळवी यांनी केले.
राष्ट्रीय परिषदेच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ईश्वर सौंदाणकर, उपप्राचार्य डॉ.आशिष गुजराथी, कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य मा.डॉ.संजय चौधरी,परिषदेचे समन्वयक प्रा.डॉ. उत्तम सोनकांबळे, प्रा.डॉ. नारसिंग वळवी प्रा.डॉ. संबोधी देशपांडे, समाजकार्य महाविद्यालय चोपडा व कला वाणिज्य महाविद्यालय चोपडा येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
