आजार होण्याआधी योग करा, निरोगी आयुष्य घडवा'- सचिव डॉ. सौ.स्मिता संदीप पाटील
चोपडा,दि.४(प्रतिनिधी) : येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभाग व कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी दि. 2/2/2026 पासून ते 7/2/2026 दरम्यान आत्मनिर्भर युवती अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ऍड.संदीप सुरेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. दि. ३/२/२०२६ रोजी 'तरुणीसाठी योग : ऊर्जा आणि आत्मविश्वासाचा स्रोत' याविषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या सचिव डॉ. सौ.स्मिताताई संदीप पाटील ह्या उपस्थित होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून जळगाव जिल्हा समन्वयक, विद्यार्थी विकास विभाग, कबचौ उमवि जळगाव मा. डॉ. संजय काशिनाथ पाटील, वक्त्या सौ. दिपाली जाधव, उपप्राचार्य प्रा.डॉ. ए. बी. सूर्यवंशी व समन्वयक डॉ. एस. ए. वाघ आदि उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवतीसभा प्रमुख डॉ. प्रिती रावतोळे यांनी केले त्यात त्यांनी या सहा दिवसात घेतल्या जाणाऱ्या कार्यक्रमाचा तपशील व त्याचे उद्देश्य विशद केले.
यावेळी मार्गदर्शक व योगा प्रशिक्षक दिपाली जाधव यांनी योगामुळे होणारे फायदे सांगितले. यावेळी त्या म्हणाल्या की, योगामुळे आत्मविश्वास वाढतो व संयम आणि आत्मशिस्त निर्माण होते. मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी योगा कसा महत्वाचा ठरतो व ताणतणाव कमी होतो, एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढते, मन शांत आणि स्थिर होते, नैराश्य दूर ठेवण्यास मदत होते. अनेक शारीरिक फायदे होतात पचनशक्ती सुधारते, शरीरात सकारात्मक ऊर्जा वाढते, झोपेची गुणवत्ता सुधारते, रक्तदाब, मधुमेह यांसारख्या जीवनशैलीजन्य आजारांवर नियंत्रण, रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
यावेळी जळगाव जिल्हा समन्वयक, विद्यार्थी विकास विभाग, कबचौ उमवि जळगाव डॉ.श्री संजय काशिनाथ पाटील यांनी कार्यक्रम आयोजन अतिशय चांगले असल्याचे नमूद केले व अश्या पद्धतीच्या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत महत्वाचे योगदान देतात असे मत व्यक्त करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत असताना सचिव डॉ. सौ.स्मिता संदीप पाटील म्हणाल्या की, आरोग्य हीच खरी संपत्ती आहे त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करायला नको, आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण काम, जबाबदाऱ्या आणि ताणतणाव यामध्ये इतके गुंतून गेलो आहोत की, स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळच उरत नाही. बहुतेक वेळा आजार झाला कीच आपण डॉक्टरांकडे धाव घेतो.म्हणून आजार होण्याआधी योग करा, निरोगी आयुष्य घडवा असा मंत्र त्याप्रसंगी त्यांनी दिला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार डॉ. क्रांती क्षीरसागर यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवती सभा प्रमुख डॉ. सौ प्रिती रावतोळे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. डी. डी. कर्दपवार, सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. आर आर पवार, समिती सदस्य डॉ.सौ.के. एस. क्षीरसागर, सौ.सुनिता बी. पाटील, डॉ. संगीता पाटील, सौ. रजनी जैस्वाल, सौ. हर्षा देवरे, सौ. पूजा पुन्नासे, सौ. आरती पाटील, धनंजय चौधरी, निलेश भाट, विशाल पाटील यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाच्या आयोजना दरम्यान रजिस्ट्रार डी. एम. पाटील, व्ही. पी.हौसे, डॉ. सी.आर.देवरे, डॉ. डी.एस. पाटील, डॉ.अभिजित साळुंखे, रवी पाटील, सुधाकर बाविस्कर यांचे सहकार्य लाभले.
