चोपडा येथे महात्मा फुले जन आरोग्य शिबिरात १०० रुग्णांनी घेतला लाभ

 

चोपडा येथे महात्मा फुले जन आरोग्य शिबिरात १०० रुग्णांनी घेतला लाभ 

चोपडा दि.17(प्रतिनिधी)शहरातील मोमिन अली भागात गोर गरिबांच्या आरोग्य संदर्भात समस्या सोडवण्याचा उद्देशाने श्री नृसिंह रुग्णालयाच्या सौजन्याने दि.१६ रोजी ४ ते ६ वाजेच्या वेळी महात्मा फुले जन आरोग्य शिबिर घेण्यात आले त्यात पुरुष - २५,महिला -७५एकूण- ७५ एकूण १०० रुग्णांची तपासणी  करून व त्यांना मोफत औषधी देण्यात आले १०० रुग्णांपैकी १५ रुग्णांना अन्य रुग्णालयात रेफर करण्यात आले.

 शिबिरात डॉ. दिलीप पाटील ,डॉ. कदम ,डॉ. देवेंद्र यांचा सह ४ सिस्टर (बहिणी) एआरएम सागर पाटील यांनी सेवा दिली. आरोग्य शिबिराची संकल्पना नगरसेवक भूपेंद्र गुजराथी, नगर सेविका शकिलाबी इसाख बागवान यांची होती

 शिबिरासाठी जागीन काजी ,अंजुम मिस्त्री, अशपाक कुरेशी, जमील कुरेशी, नईम शेख,इमाम शेख, साबीर अरब यांच्यासह परिसरातील समस्त कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने