लासुर श्री क्षेत्र नाटेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला शिवपार्वती विवाहसोहळा भक्तीमय साजरा

 लासुर श्री क्षेत्र नाटेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला शिवपार्वती विवाहसोहळा भक्तीमय साजरा


चोपडा दि.१७(प्रतिनिधी) : लासुर येथे  श्री क्षेत्र नाटेश्वर  मंदिरात  महाशिवरात्रीनिमित्त साबुदाणे दुध, केळीचा महाप्रसाद कार्यक्रम व शिव पार्वती लग्न सोहळा धुमधडाक्यात साजरा. भक्तीमय वातावरणात गावातील सर्व समाज बांधवानी श्री नाटेश्वर भगवंताचे दर्शन घेतले. 

 संध्याकाळी लासुर गावातुन हजारोच्या संख्येने जनसमुदाय शिवशंकर महादेव पार्वतीमाता च्या स्वंयवरांची मिरवणूक  नंदी, महादेव ,श्रीराम लक्षण ,महाबलि हनुमान वानरसेनेचा   संजीव देखावा तयार करीत वाजतगाजत संपूर्ण गावभर  मिरवणूक काढण्यात आली.   श्री क्षेत्र नाटेश्वर मंदिरात शिवशंभो हरहर महादेव जय घोष करीत पार्वतीमातेचाविधिवत पूजा करून लग्न सोहळा थाटात संपन्न झाला.प्रंसगी गावातील व परीसरातील सर्व जातीधर्माच्या लोक महाशिवरात्रीच्या महोत्सवात मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने