नगर परिषदेमार्फत चोपड्यात प्रथमच महिलांसाठी आगळा वेगळा कार्यक्रम..२०००महिलांना वाण म्हणून "स्टील वाटी वाटप" अन्नपूर्णा महोत्सव व पर्यावरणपूरक पाककला स्पर्धेसाठी उसळली तोबा गर्दी..२७ महिला बचत गटांचा सहभाग.. ५ महिला विजेत्या घोषित

 नगर परिषदेमार्फत चोपड्यात प्रथमच महिलांसाठी आगळा वेगळा कार्यक्रम..२०००महिलांना वाण म्हणून "स्टील वाटी वाटप" अन्नपूर्णा महोत्सव व पर्यावरणपूरक पाककला स्पर्धेसाठी उसळली तोबा गर्दी..२७ महिला बचत गटांचा सहभाग.. ५ महिला विजेत्या  घोषित 






चोपडा दि.४(प्रतिनिधी): चोपडा नगरपरिषदेमार्फत नगराध्यक्ष सौ.नम्रता पाटील व  मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांच्या संकल्पनेतून  माझी वसुंधरा अभियान 6.0 व स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत प्रथमच आगळा वेगळा असा अन्नपूर्णा महोत्सव व पर्यावरणापूरक पाककला स्पर्धा  नुकतीच आक्कासो शरद चंद्रिका सुरेश पाटील नाट्यगृहात पार पडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान माजी आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांनी भूषविले  तर उद्घाटन नगराध्यक्षा नम्रता पाटील यांचे शुभ हस्ते झाले.यावेळी प्रमुख पाहुणे  उपनगराध्यक्ष पंकज बोरोले, मुख्याधिकारी रामनिवास झंवर, आरोग्य सभापती रमेश शिंदे, महिला बालकल्याण समिती सभापती श्रीमती देवयानी माळी,सांस्कृतिक व क्रिडा सभापती अमोल पाटील, गटनेता रमाकांत ठाकुर, नगरसेवक प्रविण देशमुख, नगरसेवक दिपक पाटील, नगरसेविका सौ.नेहा जैन, सौ.पुजा देशमुख, सौ.वंदना बाविस्कर, सौ.वैशाली पवार,परिविक्षाधीन मुख्याधिकारी सागर शेजुळ, उपमुख्याधिकारी संजय मिसर,स्वच्छता निरिक्षक श्रीमती दिपाली साळुंके, कर निरिक्षक संदिप गायकवाड, शहर अभियान व्यवस्थापक गणेश पाठक, शहर समन्वयक स्वप्निल धनगर ,२७बचत गटाचे महिला कार्यकर्त्यां, नगरसेवक / नगरसेविकाआदी उपस्थित  होते.

पर्यावरणपूरक पाककला स्पर्धेत   60 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. यात पदार्थाची  चव व त्यांची पर्यावरणपूरक सजावट प्रेक्षकांचे महत्वाचे आकर्षण ठरले. स्पर्धेकरीता परिक्षक म्हणून डॉ.धनश्री महाजन व महिला व बालकल्याण अधिकारी श्रीमती पुनम ठाकरे,  लेखापरिक्षक भारती पाटील यांनी जबाबदारी पार पाडली.  पर्यावरणपूरक पाककला स्पर्धेचे विजेते प्रमिला छगन बडगुजर, रंजना विजय चौधरी, रुपाली 

पवन पाटील, किरण आनंदा चौधरी, अनिता संतोष पारधी हे ठरले तर 5 स्पर्धक यांना उत्तेजनार्थ ठरले. 

या स्पर्धेत   धरणगांव नगरपरिषदेतील महिला बचत गट,  दत्तकृपा महिला बचत गट (पाणीपुरी / उपवास पापड), एकदंत महिला बचत गट (पाव वडा), सुवासिनी महिला बचत गट (कळण्याची भाकर भरीत), बहुजन महिला बचत गट (मुंगभजी चहा), श्री.गजानन महिला बचत गट (चकली, शंकरपाळे, खमणपीठ, चकली पीठ), भैरवनाथ महिला बचत गट (बॅग व पर्स), वैभव महिला बचत गट (गोळा सरबत), प्रथमेश महिला बचत गट (इटली सांबार), भिमाशंकर महिला बचत गट (बिरयानी, खमणे), जय परशुराम महिला बचत गट (मिसळ पाव, पावभाजी), शिवबा महिला बचत गट (पाणीपुरी), सुहान महिला बचत गट (वडापाव), सुर्यदेवता महिला बचत गट (गोळा सरबत), श्री साईनाथ महिला बचत गट (बटाटा पोंगे), नवश्या मारोती महिला बचत गट (इटली सांबार, गाजर हलवा, पाव वडा), चमेली महिला बचत गट (मुंग भजी), क्रांती महिला बचत गट (पोंगे बटाटा केळी वेफर), बेलपत्र महिला बचत गट (समोसा कचोरी गुळाचा चहा), शिवबाबा महिला बचत गट (चौवला फल्ली, मसाला पान), संत तुकाराम महिला बचत गट (पेस्टी केक), वक्रतुंड महिला बचत गट (कळण्याची भाकर आणि ठेचा), प्रसाद महिला बचत गट (पाणीपुरी)) आदिंनी स्टॉल लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.विशेष म्हणजे या स्पर्धकांना कुठलीही सहभाग नोंद फी नगरपरिषदेमार्फत आकारण्यात आलेली नव्हती.

 हळदी-कुंकू कार्यक्रमात  प्रथम येणाऱ्या 2000 महिलांना मोफत स्टील वाटी वाण म्हणून नगरपरिषदेमार्फत वाटप करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.प्रणव पाटील यांनी केले तर आभार  संदीप गायकवाड यांनी मानले.यावेळी शहरातील नागरिक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने