चोपडा नगरपरिषदेच्या भन्नाट उपक्रमाला नारीकांचा प्रचंड प्रतिसाद.. स्वच्छता विभागातील 65 तर विद्यूत विभातील 204 तक्रारींचा निपटारा
🔲नगराध्यक्षा सौ. नम्रता पाटील व मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांच्या कुशल संकल्पनेला शहरवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
चोपडा,दि.१२(प्रतिनिधी) नगरपालिकेमार्फत नगरवासीयांना दिवाबत्ती व स्वच्छतेविषयी ताबडतोब सेवा मिळावी या मुख्य उद्देशासाठी व्हाट्सअप नंबरची नाविन्यपूर्ण सुविधा नगराध्यक्ष सौ नम्रता पाटील व मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली नुकतीच उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यास जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असून शहरभर समाधानाची लहर उठली आहे. या भन्नाट सेवेमुळे स्वच्छता विभागाकडील एकूण 105 प्राप्त तक्रारींतून 65 तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे तर विद्युत विभागाकडील प्राप्त 244 तक्रारीपैकी 204तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत "चट मंगनी पट विवाह" या हिंदी उक्तीप्रमाणे नागरी समस्यांचा निपटारा होत असल्याने नगरवासिय जाम खुश झाले आहेत.
चोपडा नगरपरिषद शहरातील नागरिकांना नियमितपणे विविध नागरी सुविधा तत्परतेने पुरविण्याचे काम करीत आहे. यामध्ये स्वच्छता, विद्युत विभाग (स्ट्रीट लाईट) विभागाशी संबंधित नागरिकांच्या तक्रारी विविध माध्यमांतून नगरपरिषदेस प्राप्त होत असतात. मात्र, अनेक वेळा नागरिकांना नगरपरिषदेच्या कोणत्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्याशी, तसेच कोणत्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा याबाबत संभ्रम निर्माण होत असतो त्यामुळे तक्रारींच्या निवारणास विलंब होत होता. परिणामी नागरिकांची हेळसांड होत असल्याचे निदर्शनास आल्याने नगराध्यक्षा सौ. नम्रता पाटील व मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांच्या संकल्पनेतून स्वच्छता विभाग व विद्युत विभागासाठी स्वतंत्र भ्रमणध्वनी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे .तक्रार निवारणासाठी स्वतंत्र व्हॉट्सअॅप क्रमांक निश्चित केला आहे. या माध्यमातून आता नागरिक घरबसल्या तक्रारी करता येत आहेत. व्हॉट्सअॅप संदेशाद्वारे आतापर्यंत स्वच्छता विभाग व विद्युत विभागाकडील विविध तक्रारी प्राप्त झाल्या त्याचा तपशिल पुढीलप्रमाणे ,
🔲स्वच्छता विभाग प्राप्त तक्रारींचा गोषवारा असा व्हॉट्सअॅप[ (तक्रारी ५२),निकाली ३१ ,प्रलंबित २१], रजिस्टर तक्रारीं [(५३),निकाली ३४ प्रलंबित१९]
🔲विद्युत विभाग तक्रारींचा गोषवारा असा व्हॉट्सअॅपवरून [(तक्रारी ४९),निकाली ४० प्रलंबित ९]जनरल तक्रारीं [(१९५),निकाली १६४ प्रलंबित ३१]
स्वच्छता विभाग व विद्युत विभागामार्फत २४ तासाच्या आत तक्रारीचे निवारण करण्यात येत आहे. परंतु काही तक्रारी काही कारणास्तव प्रलंबित आहेत.
तसेच "नागरिकांच्या तक्रारींचे तात्काळ व प्रभावी निराकरण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याची माहिती मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांनी दिली आहे. तक्रार निवारण तात्काळ होत असल्यामुळे नागरीक देखील समाधान व्यक्त करीत आहे.
.............................
नागरीकांची प्रतिक्रिया
.............................
*नमस्कार* ,
आपल्या चोपडा नगरपालिकेच्या वतीने शहरातील स्वच्छता आणि दिवाबत्ती बाबतच्या अडचणी साठी व्हाट्सअप वरून तक्रार निवारण उपक्रम सुरू करण्यात आला आहे. प्रथमतः या अभिनव उपक्रमाबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद.. या सुविधेचा आम्ही प्रत्यक्ष अनुभव घेतला. आम्ही केलेल्या तक्रारीनंतर २४ तासाच्या आत नगरपालिका कर्मचारींनी गटारींचा गाळ उचलून नेला व कॉलनी परिसर स्वच्छ करून दिला.याबद्दल
आमच्या स्व . शरदचंद्रिका आक्का कॉलनी च्या वतीने आपले मनःपूर्वक धन्यवाद.
...............................................................
तरी स्वच्छता विभाग तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक (७८२१९८९५३३) व विद्युत (दिवाबत्ती) विभाग तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक (९५२९२९६९२१) यावर तक्रार करावी असे आवाहन नगरपरिषद प्रशासनामार्फत करण्यात आले आहे .
