चोपडा नगरपरिषद प्रभाग क्र.१२अ च्या भाजपा- राष्ट्रवादी युतीच्या उमेदवार डॉ.रक्षिता प्रसाद पाटील ह्यांना मतदारांची पसंती.. सासु ,सासरे व पतीची जनसेवाही नागरिकांना भावली
चोपडा दि.२०(प्रतिनिधी) : चोपडा नगर परिषद निवडणुकीचे छाननीनंतर पात्र असलेल्या उमेदवारांनी आपापल्या वार्डांमध्ये वैयक्तिक भेटीसाठीची सुरुवात केलेली आहे . वार्ड क्रमांक १२अ मध्ये भाजपा राष्ट्रवादी युतीचे अधिकृत उमेदवार डॉ .रक्षता प्रसाद पाटील यांनाही प्रभागातून जोरदार प्रतिसाद मिळत असून मोठ्या संख्येने मतदारांनी पाठिशी असल्याची ग्वाही दिली आहे. तसेच त्यांच्या सासूबाई व सासरे यांनीही या प्रभागात उत्कृष्ट कामे केल्याची पावती म्हणून नागरिक त्यांना भरभरून प्रेम देत आहे.
भाजपा युतीच्या उमेदवार डॉ. रक्षिता प्रसाद पाटील ह्या पाटील गढीतील निवासी असून माजी नगरसेवक श्री अशोक त्र्यंबक पाटील व माजी नगरसेविका सौ शोभाताई अशोक पाटील यांच्या त्या सुनबाई आहेत . तसेच चोपडा उपजिल्हा रुग्णालयात गोरगरीब जनतेला उत्कृष्ट सेवा देणारे डॉक्टर प्रसाद अशोक पाटील यांच्या त्या पत्नी आहेत. सासू, सासरे व पती यांची सामाजिक सेवा ही मतदारांना भावली असून या वार्डात संपूर्ण पाटील कुटुंबीयांच्या सेवेच्या शिदोरीचा धागा पक्का असल्याने प्रभागातून त्यांच्या कामाचा सदोदीत गवगवा होत आहे . त्यांच्या समाजसेवेचे कार्य वाखाणण्याजोगे असल्याचे सांगत मतदारांनी त्यांना विजयी करण्याचे आश्वासित केले आहे. सध्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली नसली तरी छाननी नंतरच्या चित्रावरून डॉ. रक्षिता पाटील यांना जोरदार पसंती मिळत असून यांचा विजय पक्का असल्याचे मत प्रभागातून व्यक्त केले जात आहे.
