चोपडा नगरपालिका निवडणूकीत नगरसेवक पदासाठी माघारी नंतर १५ प्रभागात ११५ ते१२७ उमेदवार रिंगणात असण्याची शक्यता?नगराध्यक्षदाची खेळी अपक्षांचे माघारीवर अवलंबून? सायंकाळपर्यंत प्राप्त होईल अधिकृत वृत्त
चोपडा दि.२१(प्रतिनिधी)चोपडा नगर परिषद निवडणूकीत यंदा हाय व्होल्टेज वातावरण नसून जबरदस्त चुरशीच्या लढतीत कोण कशी बाजी मारेल हे सांगणे आज जरी कठीण असले तरी डावपेचांचा सराव असणाऱ्या खरा "बाजीगर "बाजी मारल्या शिवाय राहणार नाही हे जरी सत्य असले तरी आजच्या आखाड्याची परिस्थिती ही १५ प्रभांमधून नगरसेवक पदासाठी२६२ अर्ज प्राप्त जरी असले तरी त्यातून बऱ्याचशा उमेदवारांनी डबल टिबल व चौबल पर्यंत फॉर्म भरले आहेत त्यामुळे त्या फार्मा मधून जवळपास 135 नामांकन अर्जांची संख्या कमी होईल. ती संख्या अपक्षांच्या माघारीची संख्या वाढल्यास जवळपास 155 पर्यंत पोहोचू शकते .त्यामुळे निवडणूक रिंगणात आजच्या घडीला 115 ते 120 उमेदवार नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवण्यासाठी सज्ज राहतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.त्यातील अपक्ष उमेदवारांनी जर माघारीच्या आकडा जास्तीने पार केला तर रिंगणातील उमेदवारांची संख्या 100 ते 110 पर्यंत येऊ शकते. तरीही प्रत्येक प्रभागांमधून अ व ब दोन्ही गटात सहा ते बारा उमेदवार रिंगणात राहतील म्हणजेच साधारणता दुरंगी किंवा तिरंगी लढत होईल . तर काही ठिकाणी चौरंगी लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच नगराध्यक्ष पदासाठी १३ नामांकन अर्ज दाखल आहेत त्यापैकी चार उमेदवारी अर्ज अपात्र ठरली होती तर उर्वरित चार अर्ज हे डबल नामांकन असल्याने कमी होतील. त्यातही दोन अपक्षांनी जर माघार घेतली तर तिरंगी तर एकाच अपक्षाने माघार घेतली तर चौरंगी लढत अन्यथा पंचरंगी लढत नगराध्यक्षपदी पदासाठी होऊ शकते असा अनुमान लावला जात आहे.
