चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जे.सी.बी व्दारे शेत शिवार रस्ते तयार करण्याचा शुभारंभ
चोपडा दि.१६(प्रतिनिधी) दिनांक १६/१०/२०२५ वार गुरुवार रोजी चोपडा तालुक्याचे भाग्यविधाते कार्यसम्राट आमदार श्री. आण्णासो चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार ताईसो लताताई सोनवणे ह्यांच्या मार्गदर्शनाने चोपडा येथिल शेत शिवार रस्ते तयार करणे कामाचे नारळ फोडून व पुजा करून सुरुवात करण्यांत आली यावेळी शेतकरी वर्गाची मोठी उपस्थिती होती शेतकऱ्यांना शेतीमाल वाहतुकीसाठी व शेतात ये जा करण्यासाठी सुलभता मिळावी या उद्देशाने चोपडा येथे शेत शिवार रस्ते तयार करण्याच्या कामाचे शुभारंभ करण्यांत आला बाजार समितीचे सभापती, उपसभापती आणी सर्व संचालक मंडळ यांच्या पुढाकाराने व विशेष प्रयत्नामुळे शेतकरी वर्गाचा प्रश्न मार्गी लागला आहे.
गेली अनेक वर्षे शेत रस्त्याच्या खराब स्थितीमुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता पावसाळ्यात अनेक रस्ते चिखलामुळे पुर्णपणे बंद होत असत ज्यामुळे शेतीमाल वेळेवर बाजारपेठेत पोहोचवणे अशक्य होत होते या समस्येचे गांर्भीय लक्षात घेवून बाजार समितीने हा निर्णय घेतलेला होता .यावेळी उपस्थित शेतकरी वर्गाने चोपडा तालुक्याचे कार्यसम्राट आमदार श्री. आण्णासो चंद्रकांत सोनवणे , माजी आमदार ताईसो लताताई सोनवणे, बाजार समितीचे सभापती श्री. नरेंद्र वसंतराव पाटील, उपसभापती श्री. विनायकराव रामदास चव्हाण आणी सर्व संचालक मंडळासह शेतकरी श्री. सागर निबांजी बडगुजर, श्री. जितेंद्र पुरुषोत्तम अग्रवाल, श्री. सुधाकर भमरु चौधरी, श्री. राहुल जितेंद्र पठार, श्री. पुंडलिक बाबुराव महाजन, श्री. भगवान बाबुलाल बडगुजर, श्री नारायण दामु बडगुजर, श्री. प्रमोद दगडू भावसार, श्री. सैयय्द सहीस अली अय्युब अली, श्री. अरमान हनीफ खाटीक, श्री. प्रथमेश विनोंद बडगुजर, श्री. कैलास उत्तम महाजन, श्री. दिपक निंबाजी बडगुजर, श्री. कैलास नथ्थु बडगुजर, श्री जगदीश माधव पठार श्री. शे. नबी शे खलाद ह्यांनी सर्वानी आभार मानले. या रस्त्यामुळे आता आमचा वेळ आणी पैसा दोन्ही वाचेल शेतीमाल खराब होण्याचे प्रमाण कमी होईल आणी थेट बांधापर्यत वाहने पोहोचवता येतील अशा भावना शेतकऱ्यानी व्यक्त केल्या सदर शुभारंभ प्रसंगी बाजार समितीचे सभापती, उपसभापती, सर्व संचालक मंडळ, शेतकरी वर्ग, सचिव, उपसचिव कर्मचारी वर्ग व ईतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.