ज्येष्ठ नागरिक संघात जयंती निमित्त डॉ .ए .पी.जे.अब्दुल कलामांना अभिवादन !

 ज्येष्ठ नागरिक संघात जयंती निमित्त डॉ .ए .पी.जे.अब्दुल कलामांना अभिवादन !

  





 चोपडा दि.१६(प्रतिनिधी)शिक्षणासाठी दारिद्रयाशी लढत यशाला गवसणी घालतांना, देशहिताला / देश कार्याला प्राधान्य देत अविवाहित राहिलेले मिसाईल मॅन,भारताचे ११ वे राष्ट्रपती व भारतरत्न झालेले डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या ९३ व्या जयंती निमित्त त्यांच्या कार्याला, देशासाठी क्षेपणास्र क्षेत्रात दिलेल्या योगदानाला उजाळा देत त्यांना ज्येष्ठ नागरिक संघ, चोपडा येथे अभिवादन करण्यात आले .

यावेळी संघाचे सचिव विलास पाटील सर यांनी डॉ.कलाम यांच्या कार्य कर्तृत्वाचा थोडक्यात आढावा घेत, त्यांचा जन्मदिवस शासनाकडून 'वाचन प्रेरणा दिन ' म्हणून साजरा करण्याबाबत माहिती दिली ,तर संघाचे उपाध्यक्ष श्री.जे.एस. नेरपगारे यांनी डॉ . कलामांच्या प्रतिमेचे पूजन करीत माल्यार्पण केले .या अभिवादन कार्यक्रमास संघाचे सचिव दिलीप माधवराव पाटील, सहसचिव - इंजि व्ही .एस .पाटील, ज्येष्ठ सदस्य रमेश शिंदे, प्रा . श्यामभाई गुजराथी, विधी तज्ज्ञ सदस्य ॲड.व्ही.बी.पाटील, फेस्कॉम तालुका सचिव -श्री . शांताराम पाटील,प्रा.एस.के.पाटील, परशुराम पेंढारकर, गोकुळ पाटील इ .ज्येष्ठ नागरिक संघ सदस्य उपस्थित होते .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने