तापी शेतकरी सहकारी सूतगिरणी तर्फे सहकारमंत्र्यांचा सत्कार..सूतगिरण्यांना ऊर्जितावस्थेत आणण्याची मागणी
चोपडा दि९(प्रतिनिधी) तालुक्यातील घोडेगाव येथे आज दिनांक ९ रोजी चोपडा पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या शाखा उद्घाटनासाठी आलेल्या सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा तापी शेतकरी सहकारी सूतगिरणी तर्फे सत्कार करण्यात आला.
घोडगाव येथे तापी शेतकरी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन माजी आमदार कैलास बापू पाटील यांनी मंत्री महोदयांना याप्रसंगी निवेदन दिले. सहकारी सुतगिरण्यांची अवस्था वाईट आहे सरकारच्या माध्यमातून या सूतगिरण्यांना उर्जित अवस्था येईल त्या दृष्टिकोनातून मंत्रिमंडळाने प्रयत्न करावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी महाराष्ट्र विधानसभेचे माजी सभापती अरुण भाई गुजराती, माजी मंत्रीआ. अनिल भाईदास पाटील, सूतगिरणीचे उपाध्यक्ष प्रल्हाद रघुनाथ पाटील, संचालक- चंद्रकांत पाटील ,शशिकांत पाटील साहेबराव पाटील जवरीलाल जैन आदी मान्यवर उपस्थित होते. मंत्री महोदयांनी निवेदना चा सहर्ष स्वीकार केला.