जळगाव जिल्हाधिकारी पदाचा रोहन घुगे यांनी स्वीकारला पदभार

 

जळगाव जिल्हाधिकारी पदाचा रोहन घुगे यांनी स्वीकारला पदभार


जळगाव, दिनांक 9 ऑक्टोबर (प्रतिनिधी): जळगाव जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती देण्यात आलेल्या रोहन घुगे (भाप्रसे)  यांनी गुरुवार दिनांक 9 ऑक्टोबर 2025 रोजी  जिल्हाधिकारी पदभार स्वीकारला. 

 यापूर्वी श्री. घुगे जिल्हा परिषद ठाणे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हा परिषदेला डिजिटल प्रशासन, शिक्षण, आरोग्य व ग्रामीण विकास या क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळाले असून “कार्यालयीन मूल्यमापन”- १०० दिवसांचा कृती कार्यक्रमाअंतर्गत राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. 

दरम्यान, माजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची बदली नाशिक येथे झाली असून त्यांच्या जागी शासन आदेशान्वये रोहन घुगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पदभार स्वीकारताना अपर जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर व निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण आदी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने