चोपडा न.प.चे १५ प्रभागांचे ३१ जागांसाठी आरक्षण जाहीर.. ♦️प्रभाग क्रं.३ व ४ मध्ये अनुसूचित जाती तर १४ व १५ मध्ये अनुसूचित जमातीलाही संधी.. नागरींकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण ला गोल्डन चान्स ♦️ एकमेव प्रभाग क्रमांक १५ मध्ये तीन जण नगरसेवक बनणार


चोपडा न.प.चे १५ प्रभागांचे ३१ जागांसाठी आरक्षण जाहीर..

♦️प्रभाग क्रं.३ व ४ मध्ये अनुसूचित जाती तर १४ व १५ मध्ये अनुसूचित जमातीलाही संधी.. नागरींकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण ला गोल्डन चान्स 

♦️ एकमेव प्रभाग क्रमांक १५ मध्ये तीन जण नगरसेवक बनणार

♦️ चोपड्यात राहणार महिला राज 

 चोपडा दि.८(प्रतिनिधी)- येत्या नगरपरिषद निवडणुकीसाठी चोपडा शहरातील प्रभाग आरक्षणाचा तक्ता प्रांताधिकारी नितीशकुमार मुंडावरे यांच्या  मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आला आहे. यावेळी  मुख्याधिकारी झंवर,उपमुख्याधिकारी संजय  मिसर, कर निरिक्षक प्रणव पाटील, बांधकाम अभियंता श्री.वाघ व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.एकूण १५ प्रभागांसाठी 'अ' आणि 'ब' या गटांनुसार पुरुष व महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. जाहीर करण्यात आलेल्या आरक्षणानुसार काही प्रभाग सर्वसाधारण (जनरल), काही अनुसूचित जाती (एस.सी.) तसेच काही नागरिकांचा मागास प्रवर्ग  पुरुष व महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.त्यात प्रभाग ३ व प्रभाग ४ मध्ये अनुसूचित जाती महिला व पुरुषांना संधी मिळाली आहे तर प्रभाग १४ व प्रभाग १५ मध्ये अनुसूचित जमाती महिला -पुरुषास संधी मिळाली आहे.विशेष म्हणजे प्रभाग १५ यात तीन उमेदवार उभे राहू शकणार आहेत.बाकी उर्वरित १४ प्रभागांमध्ये दोन उमेदवार उभे राहू शकणार आहेत.असे एकुण ३१ उमेदवार भविष्य अजमावतील.नागरीकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण यांना नाही संधी मिळाली आहे.यात सर्वाधिक १६उमेदवार ह्या  महिला वर्गाला राखीव असल्याने महिला राज चोपड्यात राहिल. त्या दृष्टीने अनेकांना घरातील गृहमंत्र्यांसाठी फिल्डींग लावण्यात कसब पणाला लावावी  लागणार आहे.

 या आरक्षणामुळे शहरातील विविध समाजघटकांना प्रतिनिधित्व मिळणार असून, नगरपरिषद निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना आता वेग येत आहे. राजकीय कार्यालयांमध्ये इच्छुकांची ऊठबस सुरू होणार आहे.

प्रभाग निहाय आरक्षण जागा अ)ब)क) पुढील प्रमाणे 

♦️प्रभाग क्रमांक : 1

 अ)नागरिकांचा मागास प्रवर्ग    

 ब)सर्वसाधारण महिला            

♦️प्रभाग क्रमांक : २ 

अ)नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

ब)सर्वसाधारण

 ♦️प्रभाग क्रमांक : ३

अ)अनुसूचित जाती महिला

ब)सर्वसाधारण

♦️प्रभाग क्रमांक : ४

अ)अनुसूचित जाती

ब)सर्वसाधारण महिला

♦️प्रभाग क्रमांक : ५

अ)नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

ब)सर्वसाधारण

 ♦️प्रभाग क्रमांक : ६

अ)नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

ब)सर्वसाधारण

♦️प्रभाग क्रमांक : ७ 

अ)सर्वसाधारण महिला

ब)सर्वसाधारण

♦️प्रभाग क्रमांक : ८ 

अ)नागरिकांचा मागास प्रवर्ग

ब)सर्वसाधारण महिला

♦️प्रभाग क्रमांक : ९ 

अ)सर्वसाधारण महिला

ब)सर्वसाधारण

♦️प्रभाग क्रमांक : १० 

अ)नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

ब)सर्वसाधारण

♦️ प्रभाग क्रमांक : ११ 

अ)सर्वसाधारण महिला

ब)सर्वसाधारण

 ♦️प्रभाग क्रमांक : १२ 

अ)नागरिकांचा मागास प्रवर्ग

ब)सर्वसाधारण महिला

♦️प्रभाग क्रमांक : १३

अ)सर्वसाधारण महिला

ब)सर्वसाधारण

 ♦️प्रभाग क्रमांक : १४ 

अ)अनुसूचित जमाती

ब)सर्वसाधारण महिला

♦️प्रभाग क्रमांक : १५

अ)अनुसूचित जमाती महिला

ब)नागरिकांचा मागास प्रवर्ग

क)सर्वसाधारण महिला








Post a Comment

थोडे नवीन जरा जुने