चोपडा येथील दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयाचा संघ युवारंग २०२५ चा. उपविजेता

 चोपडा येथील दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयाचा संघ युवारंग २०२५ चा. उपविजेता

चोपडा दि.१७(प्रतिनिधी): येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयाचा युवारंग २०२५ चा उपविजेते पदाचा मान मिळवला आहे. या वर्षी महाविद्यालयातील ५० विद्यार्थी युवारंग २०२५ मध्ये सहभागी झाले होते. त्यात त्यांनी २३ कलाप्रकारात सहभाग नोंदविला व ११ कला प्रकारात विद्यार्थ्यांनी बाजी मारुन १२८ महाविद्यालयांमधुन दुसरा क्रमांक मिळवुन उपविजेते ठरले आहेत. यात ०२ गोल्ड,०५ सिल्व्हर व ०४ कास्य पदांचा समावेश होता. भारतीय लोक संगीत, इन्स्टॉलेशन या प्रकारात गोल्ड, भारतीय समुह लोकनृत्य, शास्त्रीय सुरवाद्य, शास्त्रीय तालवाद्य, मातीकाम, यात रजत पदक मिळाले. व नाट्य संगीत, चित्रकला, पाश्चिमात्य समुह गायन, भारतीय सुगम गायन, पाश्चिमात्य वाद्य वाचन या कला प्रकारात कास्यपदक मिळाले आहे.

 या बद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. अॅड. संदीप सुरेश पाटील, सचिव मा. डॉ. स्मिताताई संदीप पाटील यांनी विद्यार्थ्यांना गौरविले. गौरवउद्‌गारात अॅड. संदीप पाटील यांनी विद्यार्थ्यांना अजुन कसुन सराव करा व यश मिळया. या युवारंगातील विद्यार्थी कलेच्या क्षेत्रात भरीव कामगीरी करीत आहे याचा आम्हाला अभिमान आहे. अशिच यशस्वी घौडदौड सुरु ठेवा.असे गौरवउद्‌गार त्यांनी काढले. त्यावेळी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य प्रा. के. एन. सोनवणे, उपप्राचार्य प्रा.आर.एम. बागुल.प्रा.ए.बी. सुर्यवंशी, समन्वयक डॉ. एस. ए. वाघ, डॉ. एच. जी. चौधरी, डॉ. व्ही.आर. हुसे, श्री.एस.पी. सोनवणे, श्री. के. एस. खंडागळे, श्री. मकरंद चौधरी व बहुसंख्य विद्यार्थी हजर होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने