जळगावचे नवे जिल्हाधिकारी रोहन घुगे ..आयुष प्रसाद यांची नाशिकला बदली
जळगाव दि.७(प्रतिनिधी)जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची शासनाने नाशिक जिल्हाधिकारीपदी बदली केली असून त्यांच्या जागी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची पदोन्नतीवर जळगावी बदली करण्यात आली आहे.शासनाच्या अवर मुख्य सचिव (सेवा) व्ही. राधा यांची बदलीच्या आदेशावर स्वाक्षरी आहे.
रोहन घुगे यांनी आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्याकडे सुपूर्द करून, जळगाव जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडून त्वरित स्वीकारावा, असे आदेशात नमूद आहे. दरम्यान, आयुष प्रसाद यांची नाशिक जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. राज्यातील सात अधिकाऱ्यांच्या आज शासनाने बदल्या केल्या आहेत.रोहन घुगे यांच्या ठाणे येथील कार्यकाळात त्यांनी प्रशासनिक पातळीवर अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले. आता ते जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारणार असून त्यांच्या नवीन कार्यकाळाकडे जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.