मृत्यूनंतरची इच्छा पूर्ण...देहदान केल्याने अनेक भारावले
चोपडा,दि.७(प्रतिनिधी)-* येथील पवार नगर, चोपडा रहिवासी (मुळगाव - खिरोदा ता. रावेर) जगन्नाथ खुशाल महाजन (वय ८८) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना,नातवंडे,पंतवंडे असा परिवार असून ते सेवानिवृत्त सहा.पशुधन विकास अधिकारी होते.त्यांनी मुंबई, जळगाव,सोनवद,पहूर,फत्तेपूर, लासूर,नेरी,अहिरवाडी,खिर्डी,फैजपूर,विवरे येथे गुरांचे डॉक्टर म्हणून इमानेइतबारे सेवा दिलेली होती.
चोपडा येथील ललित कला केंद्राचे से.नि.प्राचार्य राजेंद्र महाजन, नंदकुमार महाजन (से.नि.क्लास वन अधिकारी) व रामदास महाजन (घरडा केमिकल्स,चिपळूण) यांचे वडील होते.
पुरोगामी विचारआचारांचे डॉ.जे.के.महाजन यांनी २४ मे २०१८ दिवशी केलेल्या देहदानाच्या संकल्पानुसार त्यांचे शव जळगाव येथील डॉ उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या पथकाकडे सुपूर्द करण्यात आले.त्यांच्या कुटूंबियांनी देहदान करुन त्यांची इच्छापूर्ती केली.त्यांच्या पत्नीनेही २०२३ मध्ये देहदान केलेले होते.