राष्ट्रीय रंगोत्सव सेलिब्रेशन स्पर्धेत कस्तुरबा विद्यालयाचे यश..! २७ सुवर्ण पदक, १५ रजत, व १० कास्य पदकाचे मानकरी..! आमना शेख राज्यात द्वितीय ..!

 राष्ट्रीय रंगोत्सव सेलिब्रेशन स्पर्धेत कस्तुरबा विद्यालयाचे  यश..!

२७ सुवर्ण पदक, १५ रजत, व १० कास्य पदकाचे मानकरी..! आमना शेख राज्यात द्वितीय ..!


चोपडा येथे यश प्राप्त कस्तुरबा विद्यालयातील विद्यार्थी समवेत मुख्याध्यापक एस एल पाटील,कपिल बाविस्कर, व्ही पी पाटील,एन सी कोळी आदी..

चोपडा,दि.१३(प्रतिनिधी) :-- येथील कस्तुरबा माध्यमिक  विद्यालयातील इयत्ता ५ वी ते ९वी मधील २०१ विद्यार्थ्यांनी मुंबई येथील राष्ट्रीय रंगोत्सव सेलिब्रेशन स्पर्धेत सहभाग घेतला होता यात ५४ विद्यार्थी पदकाचे मानकरी ठरले.यामध्ये २७ विद्यार्थ्यानी सुवर्ण पदक, १५ विद्यार्थ्यानी रजत, व १० विद्यार्थ्यानी कास्य पदक पटकाविले आहे.राष्ट्रीय रंगोत्सव सेलिब्रेशन स्पर्धेत विद्यालयातील आमना कलीम शेख हि विद्यार्थिनी राज्यात द्वितीय क्रमांक आर्ट मेरिट अवॉर्ड ए प्लस ग्रेड मिळवीत उत्तीर्ण झाली आहे.तर पलक नरेंद्र पाटील या विद्यार्थिनीने सुद्धा ए प्लस ग्रेड मिळवीली आहे.

# यांना मिळाले सुवर्ण पदक :-- 

यात सोनम विसावे, कृतिका पाटील, साक्षी इंगळे, पायल पाटील, मोसिन खाटीक, धीरज पाटील, मयूर अल्करी, हेमलता गायकवाड, दिव्या पाटील, नम्रता पारधी, आमना शेख, सेजल पवार, राशी सूर्यवंशी, संध्या गोसावी, तेजस बोरसे, माहेश्वरी पाटील, पूनम महाजन ,देवश्री मोरे, श्रद्धा बाविस्कर, यश कोळी ,नंदिनी पाटील ,छाया बारेला, अल्फिया रशीद, शेख, ऐश्वर्या जाधव, गौरी भार्गव, अवनी पाटील, कौसर खाटीक, यांना सुवर्ण पदक मिळाले

# यांना मिळाले रजत पदक :-- 

कशिश माळी, रुपेश पाटील, तेजस्विनी पाटील, रितू पाटील, धनश्री चौधरी, जानवी कोष्टी, तन्वी पाटील, मोहित पाटील, जानवी पाटील, तमन्ना मुस्ताक, राजरत्न सपकाळे ,वैभव पारधी ,प्रांजल गोसावी ,रवीता लोहारे, दौलत बारेला, यांना रजत पदक मिळाले.

# यांना मिळाले कास्य पदक :-- 

रितेश अलकरी, हर्षदा बोरसे , काव्या मोरे, अक्षरा मिस्त्री, साक्षी दाभाडे, कावेरी पाटील ,धनश्री चौधरी ,तन्मय पाटील, कार्तिक पाटील, रितिका पाटील, यांना कास्य पदक मिळाले. या सर्व विद्यार्थ्यांना कला शिक्षक निखिल कोळी यांनी मार्गदर्शन केले होते.सर्व यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष ॲड संदीप पाटील,सचिव डॉ स्मिता पाटील,मुख्याध्यापक एस एल पाटील आदींनी अभिनंदन केले आहे.



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने