जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत चोपडा येथील प्रताप विद्या मंदिराची 19 वर्षे वयोगटात विभागीय स्तरावर उत्तुंग भरारी
चोपडा दि.१९(प्रतिनिधी)19 ऑक्टोबर 2025 रोजी जळगाव जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धा एम एम कॉलेज पाचोरा या ठिकाणी संपन्न झाल्या सदर स्पर्धां मध्ये प्रताप विद्यामंदिर चोपडा येथील 19 वर्षे मुलांच्या गटात चोपडा तालुक्याच्या वतीने हॅमर थ्रो खेळ प्रकारात काव्य हितेश लाड बारावी विज्ञान या खेळाडूने जिल्हास्तरावर सहभाग घेत तब्बल 29.87 मीटर अंतरापर्यंत हॅमर थ्रो करून जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवून सदर खेळाडूची नाशिक येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे .
विजयी खेळाडूचे संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष,चेअरमन, सचिव संस्थेचे सर्व पदाधिकारी, समन्वयक शाळेचे मुख्याध्यापक, उपप्राचार्य, उपमुख्याध्यापक,पर्यवेक्षक,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी यांनी मनःपूर्वक कौतुक केले.या खेळाडूंना शाळेचे क्रीडाशिक्षक नरेंद्र एन. महाजन सर, व विद्यालयाच्या सर्व माजी खेळाडू यांचे मार्गदर्शन लाभले.