कस्तुरबा बालसंस्कार केंद्रात दिवाळी उपक्रम साजरा..!
चोपडा,दि.१९(प्रतिनिधी)--येथील कस्तुरबा महिला समाज संचलित कस्तुरबा बालसंस्कार केंद्रात चिमुकल्यांना दिवाळी सणाचे महत्त्व समजण्यासाठी पाच दिवसीय उपक्रम साजरा करण्यात आला.
वसुबारस, धनत्रयोदशी, पाडवा, लक्ष्मीपूजन, भाऊबीज या पाच दिवसाचे महत्व व संस्कृती जोपासली जावी हे मुलांच्या निरीक्षणाने ते लक्षात यावे व चिरकाल लक्षात असावे यासाठी प्रत्यक्ष दिवाळी साजरी करण्यात आली. त्यासाठी मुलाची तयारी करून प्रसादाचा नैवेद्य ठेवून व आरती पूजन करून तसेच फटाक्याची आतिषबाजी फोडून कार्यक्रम उत्साहात घेण्यात आला, या कार्यक्रमाचे मार्गदर्शक बालवाडी विभागाच्या मुख्याध्यापिका रेखा पाटील यांनी केले , कार्यक्रम यशस्वीते साठी कीर्ती पाटील, साधना देशमुख, कविता कोंडे यांनी सहभाग घेतला. तसेच माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एस एल पाटील , मुख्याध्यापिका प्रतिभा पाटील यांचे सहकार्य मिळाले. तसेच चिमुकल्यांना दीपावली निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष ॲड संदीप पाटील, सचिव डॉ स्मिता पाटील आदींनी शुभेच्छा दिल्या.पालकांनीही कार्यक्रमाचे कौतुक केले.
फोटो :-- कस्तुरबा बालसंस्कार केंद्रात
दिवाळी उपक्रम साजरा करतांना चिमुकले...