चोपडा कलाध्यापक संघाकडून सेवापूर्ती सन्मान सोहळा संपन्न

 चोपडा कलाध्यापक संघाकडून सेवापूर्ती सन्मान सोहळा संपन्न


चोपडा,दि.९(प्रतिनिधी)- अखिल महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक संघ संलग्नित,कलाध्यापक संघ चोपडा यांचेकडून नुकतेच दि.07/09/2025 वार रविवार रोजी सेवानिवृत्त कलाशिक्षक श्री.पी.ए.महाजन (कलाशिक्षक विद्याभारती माध्यमिक विद्यालय विरवाडे ) ,श्री.पी.एच.महाजन ( कलाशिक्षक भाऊसाहेब शा.शि.पाटील माध्यमिक विद्यालय चहार्डी ),श्री.वसंत नागपुरे ( कलाशिक्षक, पर्यवेक्षक तथा मुख्याध्यापक सी.बी.निकुंभ माध्यमिक विद्यालय घोडगांव ) यांचा सपत्नीक *सेवापूर्ती सन्मान सोहळा* सन्माचिन्ह,ट्रॉफी,शाल-बुकेसहित गौरव करून संपन्न झाला.

या सन्मान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी श्री.एस.डी.भिरुड सर ( अध्यक्ष जळगांव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पतपेढी जळगांव तथा सचिव अखिल महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक संघ ) हे होते श्री.एस.डी.भिरूड सर यांनी अध्यक्षिय भाषणातून सेवानिवृत्त कलाशिक्षकांच्या सेवेत असतांना केलेल्या कार्याविषयी भावना व्यक्त करुन चोपडा कलाध्यापक संघाच्या स्तुत्य उपक्रमाविषयी,कार्याविषयी वाखाणणी करून आर्थिक देणगी देऊन गौरव केला.कलाशिक्षकांच्या समस्याबद्दल मार्गदर्शन केले.तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री.एन.ओ.चौधरी ( जिल्हा अध्यक्ष कलाध्यापक संघ जळगांव ),श्री.अरुण सपकाळे ( जिल्हा सचिव कलाध्यापक संघ जळगांव ),श्री.राजेंद्र भारंबे ( उद्योजक जळगांव ) हे होते आणि प्रमुख उपस्थिती असलेले ललित कला केंद्राचे मा.प्राचार्य श्री.राजेंद्र महाजन यांनी सत्कारमूर्तींविषयी आपल्या मनोगतातून भावना व्यक्त केल्या. जळगांव जिल्हा माध्यमिक पतपेढीचे संचालक तथा लोकमत वृत्तपत्राचे पत्रकार श्री.एस.आर.सोनवणे,ललित कला केद्राचे विद्यमान प्राचार्य श्री.सुनिल बारी यांचीही प्रमुख उपस्थिती होती.चोपडा कलाध्यापक संघाचे अध्यक्ष श्री.अर्जुन कोळी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सत्कारमूर्तींचा परिचय दिला.श्री.पंजाबराव बाविस्कर ( मा.अध्यक्ष चोपडा कलाध्यापक संघ ), श्री.दिपक शिसोदीया ( कार्याध्यक्ष चोपडा कलाध्यापक संघ ) यांनी आपल्या मनोगतातून सेवानिवृत्त कलाशिक्षकांविषयी भावना व्यक्त करून परिचय दिला.सत्कारमूर्ती श्री.वसंत नागपुरे यांनी सेवानिवृत्ती सन्मान सोहळा घडवून आणल्याबद्दल चोपडा कलाध्यापक संघाविषयी चांगल्या भावना व्यक्त करुन संघासाठी सेवानिवृत्त कलाशिक्षकांकडून संघाला आर्थिक मदत म्हणून देणगी जाहीर केली.कार्यक्रमाचे ईशस्तवन श्री.प्रदीप कोळी ( संगीत शिक्षक प्र.वि.मंदिर ),फलक लेखन श्री.कमलेश गायकवाड ( कलाशिक्षक प्र.वि.मंदिर ),कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.प्रविण शिंदे ( सचिव कलाध्यापक संघ चोपडा ) यांनी व आभार प्रदर्शन श्री.दिपक शिसोदीया ( कार्याध्यक्ष कलाध्यापक संघ चोपडा ) यांनी केले.कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक प्रताप विद्यामंदिर चोपडा यांचे अनमोल सहकार्य लाभले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.पंकज नागपुरे ( कलाशिक्षक तथा पर्यवेक्षक प्र.वि.मंदिर चोपडा ),श्री.राकेश विसपुते ( कलाशिक्षक विवेकानंद विद्यालय चोपडा ) व चोपडा तालुक्यातील सर्व कलाशिक्षक बंधू,भगिनीं ,ललित कला केद्र चोपडा आणि चोपडा कलाध्यापक संघाचे सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने