खाजगी बस पुलाचे कठडे तोडून कोसळली १जण ठार २५ जखमी..आमोद्याजवळील दूर्घना

 

खाजगी बस पुलाचे कठडे तोडून कोसळली १जण ठार २५ जखमी..आमोद्याजवळील दूर्घना

यावल दि.६(प्रतिनिधी): फैजपूर -भुसावळ रस्त्यावरील आमोद्या जवळील मोर नदीच्या पुलावरून पुलाचे कठडे तोडून प्रवाशांनी खच्चून भरलेली मध्यप्रदेशातील खाजगी बस पुलाखाली कोसळून भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना आज दिनांक ६जुलै रोजी सकाळी 8.30 वाजेच्या दरम्यान घडली.
यावल तालुक्यातील आमोदा- फैजपूर रस्त्यावर इंदोरहून जळगावकडे येणारी प्रवाशांनी भरलेली श्री गणेश लक्झरी खासगी बस पुलाचा कठडा तोडून थेट पुलावरून सुमारे 20 ते 25 फूट खाली कोसळली. या भीषण अपघातात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत असून 25 ते 30 प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले. पोलिसांना या बाबत माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस ही पोहोचले असून जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अद्याप अपघाताचे कारण समोर आलेले नसले तरी चालकाचे नियंत्रण सुटल्या मुळे अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. या ठिकाणी परिसरात या आठवडाभरात अनेक अपघात घडले आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने