गुणवत्ता यादीत झडकून नवोदय प्रवेशासाठी पात्र..कोळंबा जि.प.शाळेची गौरी कोळीचे उत्तुंग यश

 गुणवत्ता यादीत झडकून नवोदय प्रवेशासाठी पात्र..कोळंबा जि.प.शाळेची गौरी कोळीचे उत्तुंग यश 

चोपडा,दि.२(प्रतिनिधी) तालुक्यातील कोळंबा येथील गौरी किशोर कोळी नवोदय प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे .18 जानेवारी 2025 रोजी झालेल्या जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेत कोळंबा येथील जि ,प, उच्च प्राथमिक शाळेतील, पाचवीतील विद्यार्थ्यांनी गोरी किशोर कोळी ही गुणवत्ता यादीत आली असून नवोदय विद्यालय प्रवेशासाठी तिची निवड झाली आहे.

तसेच नुकत्याच झालेल्या शाळेच्या शताब्दी वर्षात    गौरीने शाळा  व गावाचे नाव लौकिक केले आहे तिला वर्ग शिक्षिका श्रीमती सुनिता धनराज पाटील यांनी मार्गदर्शन केले आहे, याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य, मुख्याध्यापक ,सर्व शिक्षक, तसेच गावातील नागरिकांनी आनंद व्यक्त करत गौरीचे सर्वत्र कौतुक होत आहे


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने