भार्डू विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीने 67 व्या वर्षी देखील 100% कर्ज फेडीची परंपरा राखली कायम
चोपडा दि.२(प्रतिनिधी)तालुक्यातील भार्डू विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीने 67 व्या वर्षी देखील बँक कर्ज 100% फेडीची परंपरा कायम ठेवली असून यावर्षी देखील आपल्या भार्डू सोसायटीने 31 मार्च च्या आधी बँक कर्जाची 100% फेड केलीआहे.
100% कर्जफेड करण्यामागचे सर्व योगदान आणि सहकार्य आपल्या संस्थेचे सर्व कर्जफेड करणारे सन्माननीय सभासदांचे असून सर्व सन्माननीय सभासदांचे आभार मिलिंद गणपतराव पाटील यांनी मानले. याप्रसंगी मिलिंद गणपतराव पाटील चेअरमन राजेंद्र भाऊराव ठाकूर व्हाईस चेअरमन, बाळकृष्ण पाटील, प्रभाकर पाटील , किशोर पाटील तुकाराम पाटील गुलाबराव पाटील, वसंत पाटील, सौ. जनाबाई पाटील, सौ. जयश्री पाटील, सौ.शोभाबाई पाटील वना पाटील, भरत पाटील , रमेश अहिरे संचालक व सचिव सुनील सोनवणे यांचे जिल्हा बँकेचे माननीय अध्यक्षश्री संजय पवार तसेच जिल्हा बँकेचे संचालक माननीय घनश्याम भाऊ अग्रवाल व जिल्हा बँकेचे एमडी देशमुख साहेब यांनी अभिनंदन केले.
