बोरअजंटी जि प उच्च प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न
चोपडा दि.१८(प्रतिनिधी) दि.17/4/2025 गुरुवार रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोरअजंटी ता.चोपडा येथे इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांचा *निरोप समारंभाचा कार्यक्रम केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.देवेंद्रजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख अतिथी सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. गुरुदत्तजी निंबाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या वेळी विद्यार्थ्यांनी सात वर्षातील त्यांचा शैक्षणिक विकास व गुणवत्तेबाबत, शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीबाबत , शिस्त व संस्काराबाबत , वर्गशिक्षिका सौ. उज्वला पाटील ,श्री.सुनिल पाटील ,श्रीमती.सुरेखा पाटील, श्री.प्रदीप बागुल ,श्रीमती.रविना भादले तसेच मुख्याध्यापक व शिक्षक वृंदांचे ऋण व्यक्त केले . ऋण व्यक्त करताना विद्यार्थी भावनिक झाले होते . शाळेने दिलेले प्रेम, दिलेले संस्कार आम्ही चिरकाल टिकवून ठेवू व आमच्या गुणवत्तेत वाढ करू व यशस्वी असे नागरिक बनून शाळेला व गावाला आमचा अभिमान वाटेल असे कार्य करू -अशी ग्वाही विद्यार्थ्यांनी त्यांच्या भाषणात दिली. तदनंतर नागलवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख यांनी विद्यार्थ्यांची एक ऍक्टिव्हिटी घेऊन विद्यार्थ्यांना *आपल्यातील सुप्त गुण व क्षमता ओळखून आपले जीवन उज्वल करण्यासाठी शिक्षणाचा कसा उपयोग करून घ्यावा* - आपले ध्येय,आपले स्वप्न नेहमी मोठे असावे - असे त्या ऍक्टिव्हिटी मधून त्यांनी विद्यार्थ्यांना दाखवून दिले . *सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. निंबाळे यांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्याविषयी व येणाऱ्या काळातील स्पर्धांविषयी विद्यार्थ्यांना जागृत करून प्रेरणा दिली व खाऊचे वाटप केले*. श्रीमती सुरेखा पाटील मॅडम व श्री. सुनिल पाटील (प्रभारी मुख्याध्यापक) यांनी विद्यार्थ्यांना यशवंत व्हा, कीर्तीवंत व्हा,गुणवंत व्हा , गावाचे,समाजाचे व शाळेचे नाव उज्वल करा अशा शुभेच्छा दिल्या ; तसेच आपल्या हातून आई-वडिलांची समाजाची सेवा कशी घडत राहील ,असे कार्य करा - अशी प्रेरणा दिली.
कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांसाठी *मिष्ठांन्नभोजन* (शेव भाजी व बाजरीभाकरी,सोनपापडी, पापड, जिलेबी, लोणचे ,भात, सलाद) व्यवस्था करण्यात आली होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समिती, सर्व शिक्षक वृंद, अंगणवाडी ताई, स्वयंपाकी ताई या सर्वांचे अनमोल असे सहकार्य लाभल्यामुळे कार्यक्रम यशस्वी झाला.