कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे वसतिगृहात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने विविध स्पर्धा संपन्न

 

कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे वसतिगृहात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने विविध स्पर्धा संपन्न

चोपडा दि.15(प्रतिनिधी) येथील कमला नेहरू मागासवर्गीय मुलींच्या वस्तीगृहात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांच्या 135 व्या  जयंतीनिमित्त विविध स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. यात  प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकविणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ . बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष महेश पी. शिरसाठ यांनी युग पुरूष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला व बाबासाहेबांच्या विचारांची माहिती विषद केली.अधिक्षिका कावेरी कोळी व विद्यार्थिनींनी प्रतिमा पूजन केले . तदनंतर  सुंदर हस्ताक्षर व वकृत्व स्पर्धा घेण्यात आली.
वकृत्व स्पर्धेत संजना विकास डावर हिने प्रथम बक्षीस पटकावले तर मोनाली रामदास पावरा या विद्यार्थीनींने  सुंदर अक्षर स्पर्धेत प्रथम  क्रमांक पटकावला. अंजली विकास मोरे, ज्योती प्यारसिंग बिलाला, राजनंदनी पावरा, रोशनी सुरेश मोरे, सपना तुकाराम बारेला यांनी उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त केले. यावेळी विद्यार्थी कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने