आमदार निधीतून अनवर्दे - बुधगाव येथे ८३ लाखांच्या विकास कामांचे भूमिपूजन

 आमदार निधीतून अनवर्दे - बुधगाव येथे ८३ लाखांच्या विकास कामांचे भूमिपूजन


चोपडा दि.२४(संजीव शिरसाठ  )तालुक्यातिल अनवर्दे - बुधगाव येथे स्थानिक आमदार विकास निधीतून ८३ लाखांचे पायाभूत विकास कामांचे भूमिपूजन आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. 

   २२ रोजी संध्याकाळी ५ वाजता अनवर्दे खु. येथे ५ लाखांचा काँक्रीटीकरण रस्ता, बुधगाव येथे ३० लाखांचे सामाजिक सभागृह व ४८ लाखांचा बुधगाव ते मराठी शाळा पर्यंतचा रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे अशा विकास कामांचे उदघाटन चोपडा विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे या होत्या. तसेच चोपडा कृऊबाचे सभापती नरेंद्र पाटील,संचालक किरण देवराज, विजय वाघ, रावसाहेब पाटील, माजी उपनगराध्यक्ष विकास पाटील, पि.टी.एस. विद्यालय अनवर्दे बुधगावचे चेअरमन प्रवीण साळुंखे, पंडित कोळी, शिवाजी सैंदाणे, विनायक सैंदाणे, हिम्मत सैंदाने,  उखर्डू साळुंखे, रवींद्र वाघ, दिलीप साळुंखे, वामन साळुंखे, निंबा सोनवणे, आत्माराम कोळी, उमेश वाघ, विश्वनाथ कोळी, वासुदेव शिरसाठ, संजय पारे, बळीराम भील, कैलास शिरसाठ, नंदू शिरसाठ शालिक धनगर, नाना कोळी, भरत शिरसाठ, विनोद बोरसे, गुडा धनगर, नथू बोरसे, धनंजय साळुंखे, बापू धनगर व शेकडो शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने