दिंगबर जैन मुनिश्रीचे चोपडयात आठ दिवसांत खान्देशसह विदर्भातील अनेक भक्तांनी घेतले दर्शन

 दिंगबर जैन मुनिश्रीचे चोपडयात आठ दिवसांत खान्देशसह विदर्भातील अनेक भक्तांनी घेतले दर्शन 

चोपड़ा (प्रतिनिधि)-- जैन समाजात सल्लेखना (संथारा) मरणला अनन्य महत्व आहे.यालाच पंड़ित मरण देखील म्हणत असतात.परंतु एखाद्या संताचे चोपडयात सल्लेखना (संथारा) महोत्सव होने म्हणजे सौभाग्याचा क्षण होय. येथील गोल मंदिर जवळील.चंद्रप्रभु जैन दिंगबर धर्मशाळा संत निवास येथे दिंगबर जैन मुनिश्रीचे चोपडयात प.पूज्य. १०८ प्रभातसागरजी महाराज यांचे सल्लेखना महोत्सव (संथारा) मागिल आठ दिवसांपासून सुरु होते. आज दि.१ मार्च रोजी ५:१२ मिनिटानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

        सविस्तर असे की, दि.१ मार्च रोजी ५:१२ मिनिटानी अखेरचा श्वास घेतला त्यांचा संथाराचा आठवा दिवस होता. त्यांना मुखारविंद संध्या६ वाजुन १५ मिनिटानी कैलास शिखरचंद जैन या परिवाराला बहुमान मिळाला.  तर प्रथम चार खांदेकरी मध्ये सुरेश शांतिलाल जैन, प्रफुल्ल सुभाषलाल जैन, कैलास शिखरचंद जैन, रमेशलाल माणकलाल जैन यांना हा बहुमान मिळाला तर तेजस कीर्ती कुमार जैन यांना पुढे करुन कर्ता म्हणून राहण्याचा मान मिळाला अग्निडाग देण्या अगोदर जल अभिषेक राजेद्र, महेंद्र जवाहरलाल जैन यांच्या घराला मिळाला मुनिश्रीना अग्निडाग देण्यासाठी लागणारे चंदनाचे लाकडाचे मानकारी दिंगबर जैन श्राविका महिला मंडळ जळगांव ,जागृति महिला मंडळ, चोपड़ा यांना मिळाला अस्थिविसर्जनचा अरुण राजूलाल जैन अड़. रविंद्र राजूलाल जैन बहुमान यांना मिळाला. त्यांचे संपूर्ण नाव तर  (गृहस्थ अवस्थाचे ) प्रभाकर कोंडीभाऊ लुंगारे त्यांचा जन्म दिनांक - 3 ऑगस्ट 1948 जन्म स्थळ - कुंभार पिंपळगाव तालुका घनसावंगी जिल्हा जालना येथे झाले होते. त्यांचे शिक्षण  सन 1964 ला ते HSC उत्तीर्ण झाले सन 1967 ला ते डिप्लोमा इन को - ऑपरेशन पुर्ण केले. त्यांचे विवाह दिनांक 29 मे 1969 रोजी सौं. विजया प्रभाकर लुंगारे  यांच्याशी विवाह झाला. तदनंतर त्यांनी सहकार खात्यामध्ये रिटायर्ड होईपर्यंत नौकरी केली. ते सेवा निवृत्त 2006 ला झाले त्यांना दोन मुले व दोन मुली असे अपत्य आहेत .त्यांनी प्रतिमा धारण 108 विनीत सागर महाराज यांच्याकडून गेवराई बीड या ठिकाणी पहिली प्रतिमा धारण केली. त्यानंतर आचार्य श्री विद्यासागर जी महाराज यांच्या कडून डोंगरगड या ठिकाणी  पाचवी प्रतिमा धारण केली. आणि तदनंतर आचार्य श्री यांच्या कडूनच रामटेक या ठिकाणी सातवी प्रतिमा धारण केली. क्षुल्लक दिक्षा दिनांक 24 फेब्रुवारी 2019 या दिवशी आचार्य पवित्रसागर महाराज यांच्या कडून जैनेश्वरी क्षुल्लक दिक्षा देण्यात आली.मुनी दिक्षा 

सन - मार्च 2021 मध्ये परभणी या ठिकाणी आचार्य पवित्रसागर महाराज यांच्या कडून जैनेश्वरी मुनी दिक्षा देण्यात आली.तदनंरत त्यांनी चातुर्मास नांदेड, बन टाकळी (अंबड ), कुसुम्बा (धुळे) येथे केले.

परम.पूज्य. १०८ आचार्यश्री पवित्रसागरजी महाराज यांचे परम शिष्य शपकराज मुनिश्री परम.पूज्य. १०८ प्रभातसागरजी महाराज यांची सल्लेखना महोत्सव चोपडा येथे सुरू मागिल आठ दिवसांपासून सुरु होते.अचानक आलेल्या दैवी व शारीरिक उपसर्गामुळे पूज्य प्रभातसागरजी महाराजांनी आचार्यश्री पवित्रसागरजी महाराज यांच्या कडून दि.२३ रोजी सल्लेखनेचा (संथारा) चा स्वीकार केला होता यांना प.पू. आचार्यश्री १०८ मयंकसागरजी महाराज व प.पू.आचार्यश्री १०८ सुविधीसागरजी महाराज यांचे मंगल शुभआशिर्वाद त्यांना लाभले असून प.पू.१०८ प्रभावसागरजी महाराज यांचे मार्गदर्शनात सल्लेखना महोत्सव चोपड्यात सुरू होता आजचा  आठवा दिवस होता.

       तरी संभाजी नगर,धुळे, जळगाव, पारोला,चालीसगांव,हरेश्वर पिपळगाव, धरणगाव, बीड, कुसुंबा, सोनगिर, अश्या अनेक ठिकानाहुन समस्त श्रावक श्राविकानी या सल्लेखना (संथारा) महोत्सवाचा लाभ घेतला. यासाठी चोपडयाचा सकल दिगंबर जैन समाज यानी मेहनत घेतली. अग्निसंस्कारच्या वेळेस माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या सह सकल जैन समाजाचे भक्तगण मोठ्या संख्येणे उपस्थित होते.दिंगरब जैन समाजात प्रथमच एखाद्या मुनिश्रीने संथारा (मरण) महोत्सव संपन्न झाले तर ओसवाल समाजात जवळपास 55 वर्षा पुर्वी श्रमण संघाचे प. पु.हेमकवरजी म.सा. तर जवळपास 52 वर्षापूर्वी प.पु.हेमकवरजी म.सा.यांच्या सुष्या  प.पु.दुर्गा कवरजी म. सा.यांचे संथारा मरण झाले होते. नंतर आजच्या तीसरा योग सांगितले जात आहे. तर दिंगबर जैन समाजात पहिलाच योग असल्याचे बोलले जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने