खेडी भोकर पुलाच्या कामाचा वेग वाढणार.. जलसंपदा मंत्र्यांकडे आमदारांचे विविध मागण्यांचे निवेदन

 

खेडी भोकरी पुलाच्या कामाचा वेग वाढणार.. जलसंपदा मंत्र्यांकडे आमदारांचे विविध मागण्यांचे निवेदन


  • चोपडा दि.७(प्रतिनिधी)चोपडा विधानसभा मतदारसंघातील विविध कामे गतीने होण्यासाठी आमदार प्रा. चंद्रकांत बळीराम सोनवणे यांनी कंबर कसली असून  दि. ०५/०२/२०२५ रोजी त्यांनी जलसंपदा मंत्री  श्री.गिरीश महाजन  यांची भेट घेऊन चोपडा तालुक्यातील विविध प्रलंबित  समस्या तात्काळ सोडविणे साठी निधीची तरतूद करणेसाठी मागणी केली. त्यास मंत्री महोदयांनी ग्रीन सिग्नल दिला असून संबंधित अधिकाऱ्यांना बैठक बोलवण्याचे सुचित केल्याची माहीती पुढें आली आहे.
  सदर भेटीत आ.प्रा.सोनवणे यांनी  निम्न तापी पाडळसरे प्रकल्प येत्या ४ वर्षात पूर्ण होण्यासाठी यावर्षी अर्थसंकल्पात ५०० कोटी रुपयांची तरतुद करावी,
निम्न तापी पाडळसरे प्रकल्पाचा शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करावा,
  निम्न तापी प्रकल्प पाडळसरे या. अमळनेर बुडीत क्षेत्रातील खेडीभोकरी-भोकर पुलाचेकाम जलदगतीने होण्यासाठी जलसंपदा विभागाच्या रुपये ७५ कोटी हिस्सापैकी रुपये १५ कोटी तातडीने मंजुर करावे,गुळ मध्यम सिंचन प्रकल्पांतर्गत भुसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना मोबदला देण्यासाठी १४
कोटी ५० लक्ष निधीची  तरतूद करावी ,गुळ मध्यम सिंचन प्रकल्प येथील शेत चाऱ्या करणेसाठी निधीची तरतूद करावी , गुळ मध्यम प्रकल्पाच्या माती धरणासाठी जलावरोधन आवरण( ब्लॅंकेट) यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या उपाययोजना करणे साठी निधी मंजूर करावा. आदी मागण्या लिखित स्वरूपात निवेदनाद्वारे मागण्या केल्या आहेत.त्यावर
  ना.महाजन यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन  तापी विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री. मिलींद बोरकर यांना दूरध्वनीवरून  ह्या समस्या सोडविण्यासाठी लवकरच बैठक आयोजित करण्याबाबत सुचित केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने