दिंगबर जैन मुनिश्रीचे चोपडयात सल्लेखना महोत्सव
चोपड़ा (प्रतिनिधि)-- जैन समाजात सल्लेखना (संथारा) मरणला अनन्य महत्व आहे.यालाच पंड़ित मरण देखील म्हणत असतात.परंतु एखाद्या संताचे चोपडयात सल्लेखना (संथारा) महोत्सव होने म्हणजे सौभाग्याचा क्षण होय. येथील गोल मंदिर जवळील.चंद्रप्रभु जैन दिंगबर धर्मशाळा संत निवास येथे दिंगबर जैन मुनिश्रीचे चोपडयात प.पूज्य. १०८ प्रभातसागरजी महाराज यांचे सल्लेखना महोत्सव (संथारा) मागिल दोन दिवसांपासून सुरु आहे.
परम.पूज्य. १०८ आचार्यश्री पवित्रसागरजी महाराज यांचे परम शिष्य शपकराज मुनिश्री परम.पूज्य. १०८ प्रभातसागरजी महाराज यांची सल्लेखना महोत्सव चोपडा येथे सुरू झाले आहे. अचानक आलेल्या दैवी व शारीरिक उपसर्गामुळे पूज्य प्रभातसागरजी महाराजांनी आचार्यश्री पवित्रसागरजी महाराज यांच्या कडून दि.२३ रोजी सल्लेखनेचा (संथारा) चा स्वीकार केला. यांना प.पू. आचार्यश्री १०८ मयंकसागरजी महाराज व प.पू.आचार्यश्री १०८ सुविधीसागरजी महाराज यांचे मंगल शुभआशिर्वाद त्यांना लाभले असून प.पू.१०८ प्रभावसागरजी महाराज यांचे मार्गदर्शनात सल्लेखना महोत्सव चोपड्यात सुरू असुन आजचा तीसरा दिवस आहे
तरी समस्त श्रावक श्राविकानी या सल्लेखना (संथारा) महोत्सवाचा लाभ घ्यावा.असे आवाहन चोपडयाचा सकल दिगंबर जैन समाज, यानी केले आहे.
संपर्क :- अतुल अरुण जैन.9921040701
राहुल सुभाष जैन .7588438368
राजस राजेंद्र जैन . 9422225224
केतन छोटुलाल जैन. 9421693001
अधिक माहिती साठी ह्या नबंर वर सम्पर्क करावे.