जळगाव जिल्हा सहकार बोर्डावर प्रवीण गुजराथी बिनविरोध

 जळगाव जिल्हा सहकार बोर्डावर प्रवीण गुजराथी बिनविरोध


चोपडा दि.११(प्रतिनिधी)- येथील सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते तथा चोपडा कसबे सह.वि.का. सोसायटीचे चेअरमन प्रवीण विठ्ठलदास गुजराथी यांची जळगाव जिल्हा सहकार बोर्डाच्या २०२५ ते २०३० या कालावधीच्या निवडणुक प्रक्रियेमध्ये संचालक पदावर चोपडा तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून सर्वसाधारण गटातून बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

श्री.गुजराथी हे गत पंचवार्षीक संचालक मंडळात देखील संचालक होते.त्यांनी यापुर्वी चोपडा पीपल्स बॅकेचे व्हाईस चेअरमन,चोसाका संचालक,शेतकी संघाचे प्रेसिडेंट म्हणून काम पाहिले आहे.तसेच श्री.व्यंकटेश बालाजी संस्थांनचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत.गुजराथी यांच्या बिनविरोध निवडीबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने