आता चोपड्यात २०० खाटांचे रुग्णालयासाठी हालचाल.. आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी केल्या विविध समस्या सोडवण्याच्या सुचना
चोपडा,दि.१०(प्रतिनिधी)आमदार प्रा. श्री चंद्रकांतजी सोनवणे यांनी तालुक्यातील अधिकाऱ्यांचा कामकाजाचा विभाग निहाय आढावा घेऊन मतदार संघातील नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना करत सर्व अधिकाऱ्यांनी आप आपल्या मुख्य अधिकाऱ्यांकडे रिक्त जागांचा संबंधित पाठपुरावा करावा तसेच २००खाटांचे रुग्णालयासाठी तात्काळ अंदाज पत्रक तयार करावे तसेच सिझरसाठी रुग्णांना जळगावी पाठवू नये, शिवाय पोलिसांनी रिक्त वाहनांसाठी प्रस्ताव सादर करावा त्याचप्रमाणे रस्ते कामे दर्जेदार व्हावीत असे सांगत हर एक विभागांने महत्त्व पूर्ण अडचणी सोडवाव्यात असे सूचित केले.
या बैठकीत जनतेत शांतता राहावी व चोऱ्या होणार नाहीत याची दक्षता पोलिसांनी घ्यावी,H M P V साठी प्रभावी उपाय योजना करा, कर्मचारी निवासस्थानी बांधकाम सुरु करावेते,प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधी पुरवठा विभागात साथ रोगाचा पार्शभूमिवर औषधीचा तुटवळा भासणार नाही तसेच औषधी चा एक्सपायरी दिनांक तपासा, शासकिय आश्रम शाळेत इंग्रजी माध्यमातून शिक्षण द्यावे, चोपडा शहरातील मुंलीचे वस्तीगृह बांधकाम मोजणी करून तात्काळ सुरु करावे, आदिवासी गांवामध्ये सर्व पद अधिकारींनी पेसा गावस्तरावर बैठका घ्याव्यात, आदिवासी बांधवांना चांगल्या आरोग्य सुविधा साठी जिल्हा वाणिज्य योजनेतून ॲम्बुलंस खरेदी कराव्यात, चोपडा शहरात पिण्याचे पाणी पुरवठा शेड्युल आठ दिवसावरून 2 दिवसांनी कमी करावे,दोषदायित्व कालावधीत ज्यांचा कडे शिल्लक असलेल्या रस्त्यांची दुरुस्थी करावी,अंकलेश्वर ब्रहानपूर रस्त्यावरील पुलांची तात्काळ दुरुस्ती करावी,आवश्यक गावांना सामूहिक पाणीपुरवठा योजना घ्याव्यात, वनविभागने डिंकासाठी झाडांना जे इंजेक्शन दिले जातात त्यावर निर्बंध घालावेत,तसेच वृक्षतोड होणार नाही याची दक्षता घ्यावी
उत्पादन शुल्क इमारत बांधकाम तात्काळ मार्गी लावावे, मध्य प्रदेशातील अवैध दारू येणार नाही याची दक्षता घ्यावी आदी विविध विषयांवर प्रकाश झोत टाकून समस्या निराकरण कराव्यात असे मार्गदर्शन केले.
या बैठकीस तहसिलदार भाऊसाहेब थोरात, यावल तहसिलदार मोहन माला नाझरकर ,उपविभागीय पोलिस अधिकारी आण्णासाहेब घोलप,न.पा मुख्याधिकारी राहुल पाटील,उपजिल्हा रुग्णालय अधिक्षक डॉ सुरेश पाटील,आगार प्रमुख महेंद्र पाटील,कृषी अधिकारी दिपक साळुंखे,शिक्षणाधिकारी कविता सुर्वे,सार्वजनिक बांधकाम अभियंता विरेंद्र राजपुत,जे एस तडवी, तालुका आरोग्य अधिकारीप्रदिप लासुरकर , यावल गटविकास अधिकारी किशोर सपकाळे व इतर अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते