केजीएनच्या आशियाना मैदानात मुस्तफाबाद प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचा रंगलाय जोरदार सामना ..आज एम एस.सैय्यद कन्स्ट्रक्शन संघाची बाजी

 

केजीएनच्या आशियाना मैदानात मुस्तफाबाद प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचा रंगलाय जोरदार सामना ..आज एन एस.सैय्यद कन्स्ट्रक्शन संघाची बाजी


चोपडा दि.१०(प्रतिनिधी)शहरातील केजीएन कॉलनी परिसरात आशियाना ग्राउंड वर सुरू असलेल्या मुस्तफाबाद प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत आज दिनांक 10 रोजी एन एस सैय्यद कंट्रक्शन संघाने जोरदार  उसंडी मारली असून विजयश्री खेचून आणली आहे . उद्या जवळपास चार क्रिकेट संघामध्ये अटीतटीचा सामना रंगणार आहे. हा सामना बघण्यासाठी क्रिकेट प्रेमींची जोरदार गर्दी उसळली  आहे.
उद्याचा सामना जहांगीर ट्रान्सपोर्ट ग्रुप विरुद्ध केजीएन फ्रुट संघ तर जुगनू कंट्रक्शन संघ विरूद्ध अलामी ग्रुप तसेच  मास्टर ग्रुप विरुद्ध एन एस सय्यद कॉन्ट्रक्शन ग्रुप  असा सामना रंगणार आहे. या स्पर्धेसाठी नायरा शेख पेट्रोल पंप ,मेट्रो हॉटेल, अश्रफ अली, अपना स्टोअर्स ,कोहिनूर चिकन आदींचे सहकार्य लाभत आहे .या स्पर्धेत जवळपास आठ संघांनी सहभाग नोंदवला आहे.
चोपडा शहरातील क्रिकेटप्रेमींनी मुस्‍तफाबाद प्रीमियर लीग (MPL) स्पर्धेचा उत्साहाने आनंद घेतला. ही चार दिवसांची थरारक क्रिकेट स्पर्धा 9 जानेवारी ते 12 जानेवारीदरम्यान केजीएन कॉलनीतील “आशियाना ग्राउंड” येथे पार पडली. या प्रतिष्ठित स्पर्धेचे आयोजन AICT क्रिकेट टीमतर्फे करण्यात आले होते.

स्पर्धेने चोपड्यातील क्रिकेटप्रेमींसाठी खास पर्वणी ठरली. विविध संघांदरम्यान झालेल्या रोमांचक सामन्यांनी प्रेक्षकांचे मन जिंकले. प्रत्येक सामन्यात खेळाडूंच्या कौशल्याने आणि जिद्दीने प्रेक्षकांना खिळवून ठेवले.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामुळे केजीएन कॉलनीतील “आशियाना ग्राउंड” क्रिकेटप्रेमींसाठी चर्चेचा केंद्रबिंदू ठरला. MPL ने शहरातील क्रिकेट संस्कृतीत नवीन ऊर्जा निर्माण केली आणि सर्वांचे मन जिंकले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने