पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या शुभहस्ते धुळ्याच्या कर्तव्य दक्ष पोउनि राजश्री पाटील ह्यांचा प्रजासत्ताक दिनी गौरव

 पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या शुभहस्ते धुळ्याच्या कर्तव्य दक्ष पोउनि राजश्री पाटील ह्यांचा  प्रजासत्ताक दिनी गौरव

चोपडा दि.२७(प्रतिनिधी) : धुळे महानगरातील आझादनगर पोलीस स्टेशनच्या कर्तव्य दक्ष पोलीस उप निरीक्षक श्रीमती राजश्री दिलीप पाटील यांचा प्रजासत्ताक दिनी उत्कृष्ट कामगिरी बजावून जिल्हा पोलिस दलात बहुमोल योगदान दिल्याबद्दल पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या शुभहस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. त्या चोपडा पंचायत समितीचे  एपीओ ललित पाटील ह्यांच्या भगिनी असून त्यांना आदिवासी सेवक संजीव शिरसाठ यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

 पोउनि राजश्री दिलीप पाटील यांनी धुळे तालुका पो.स्टे. हद्दीत एक अल्पवयीन मुलगी बेवारस स्थितीत मिळुन आल्याने तिस आस्थेवाईकपणे विचारपुस करत तिचे नावाची ओळख सुहानी राजकुमार गुप्ता( वय १६ वर्षे रा. ताजीद्यीनपूर जि. जौनपूर उत्तरप्रदेश ) अशी पटल्यानंतर  सदर पिडीत ही १८ आठवड्यांची गर्भवती असल्याचे लक्षात आल्यानंतर धुळे तालुका पो.स्टे.ला अज्ञात आरोपीवर भा.द.वि. कलम ३७६ व पोस्को अधिनियामा प्रमाणे गुन्हा दाखल करून सदर पिडीतेच्या पालकांचा शोध घेण्यास व सदर पिडीतेस तिचे कायदेशीर पालकांच्या ताब्यात देण्यात   तपास अधिकारी श्रीमती राजश्री दिलीप पाटील यांनी  मोलाची कामगिरी बजावली.  त्या कार्याची दखल त्यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारींना गौरविण्यात आले आहे.

या सोहळ्यास माजीमंत्री डॉ. सुभाष भामरे, खा. डॉ. शोभाताई बच्छाव, आमदार अनुप अग्रवाल, आमदार राम भदाणे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधिक्षक किशोर काळे, जि.प. प्रशासक विशाल नरवडे, मनपा प्रशासक अमिता दगडे पाटील, माजी जि.प. अध्यक्षा धरती देवरे, माजी.आ.शरद पाटील, माजी महापौर प्रदिप कर्पे, रणजीत राजे भोसले, भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर आदी उपस्थित होते.  

या सन्मानाच्या अनुषंगाने श्रीमती राजश्री पाटील यांचे चोपडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा.चंद्रकांत बळीराम सोनवणे,डॉ. विश्वनाथ पाटील अडावद, कुणाल पाटील ,राहुल पाटील घोडगाव ,संजय शिरसाठ अनवर्दे,  समाधान कोळी, दिनेश गुलाब कोळी घोडगाव सुनील रामकृष्ण कोळी आदींनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने