सुरमाज फाउंडेशनचे अनोखे योगदान.. कमला नेहरू मुलींच्या वस्तीगृहास खुर्च्या भेट
चोपडा दि.२६(प्रतिनिधी) येथील कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे वसतिगृहात सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या सुरमाज फाऊंडेशन मार्फत खुर्च्या सप्रेम भेट म्हणून प्रदान करण्यात आल्या. १०वी विद्यार्थींनींना मार्गदर्शक,कंपास पुस्तके व फळे वाटप आदी कार्य ते नेहमीच करीत असतात त्यांच्या या कार्याने विद्यार्थींनीं मोलाचा हातभार लागत असल्याने गरजू पालकांनी आभार व्यक्त केले आहेत.
सुरमाज फाउंडेशनने खुर्चीची कमतरता लक्षात घेत 26 जानेवारी 2025 रोजी वसतिगृहाचे अध्यक्ष महेश शिरसाठ यांच्या विनंतीवरून खुर्च्या प्रदान करून आगळावेगळा कार्यक्रम घडवून आणला. यावेळी विद्यार्थींना मार्गदर्शन करतांना फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी उस्मान शेख साहेब यांनी सांगितले की, "तुम्ही मन लावून अभ्यास करा." तसेच, अभ्यासासाठी जर काही गरज भासली, तर सुरमाज फाउंडेशन सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहील, असे आश्वासन दिले.
हा सामाजिक उपक्रम यशस्वीतेसाठी फाउंडेशनचे अबुलैस शेख, डॉ. एम.डी. रागीब, जुबेर बाग, अल्फौज सर, शोएब शेख, अजीम भाई, अॅड. असीम सय्यद, अलफैज़ कुरैशी आणि प्रा. डॉ. मोहम्मद जुबेर शेख यांनी मोलाचे योगदान दिले.खुर्च्या मिळाल्याने मुलांनी आपला आनंद व्यक्त केला आणि अध्यक्ष महेश शिरसाठ सर यांनी सुरमाज फाउंडेशनचे मनःपूर्वक आभार मानले.हा उपक्रम मुलांच्या शिक्षणासाठी उपयुक्त ठरल्यासोबतच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी पाऊल ठरला आहे. सुरमाज फाउंडेशनच्या या कार्याने समाजाबद्दलची त्यांची संवेदनशीलता आणि समर्पण अधोरेखित झाले आहे.