नायलॉन मांजा विक्रेता व मांजासह पतंग उडविणाऱ्यावर ओढवणार संक्रांत..चोपडा नगरपरिषद अॕक्शन मोडवर.. कायदेशीर कडक कारवाई करण्याचा मुख्याधिकारींचा इशारा
चोपडा दि.८(प्रतिनिधी) शहरात संक्रातीच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजाची विक्री व वापर करणाऱ्या दोघांवर कायदेशीर कडक कारवाई करण्याचा इशारा नगरपालिकेने दिला असून त्या पार्श्वभूमीवर पालिके मार्फत जोरदार धाडसत्र सुरू आहे . संक्रांतीला पतंग उडवितांना कोणतीही अपरिहार्य घटना घडू नये म्हणून नगरपरिषद ॲक्शन मोडवर आली आहे. अनेक दुकानांवर धाडी घालण्यात आल्या आहेत मात्र कुठेही नायलॉन मांजा आढळून आला नसल्याचे मुख्याधिकारी श्री.राहुल पाटील यांनी म्हटले आहे.
चोपडा शहरात मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी खबरदारी घेत स्पेशल पथक तयार करून मांजा विक्रीची शक्यता असणाऱ्या संशयित दुकानात धाडी टाकून तपासणी करण्यात आली आहे .मात्र कोणत्याही विक्रेत्यांकडे नायलॉन मांजा आढळून आला नाही .छत्रपती शिवाजी महाराज चौक, मेनरोड, शिरपुर रोड, चावडी चौक इ. ठिकाणी काही दुकानांची झाडाझडती घेतली. पण तसला प्रकार कुठेही आढळून आला नाही.याउफरोक्षही नायलॉन मांजाची विक्री करताना कोणी आढळल्यास गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा श्री .पाटील यांनी पतंग विक्रेत्यांना दिला आहे. पतंग उडवतांना नायलॉन मांजाचा वापर कोणी करीत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितावरही कायदेशीर कठोर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
या धडकसत्र मोहिमेत उपमुख्याकारी श्री.संजय मिसर, कर अधिकारी श्री.संदिप गायकवाड, स्वच्छता निरीक्षक श्रीमती दिपाली साळुंके, श्री.जयेश भोंगे, श्री.व्हि.के.पाटील, लिपिक श्री.जयंत कपले, शहर समन्वयक स्वप्निल धनगर , मुकादम श्री.सुनिल बाविस्कर, श्री.किशोर पवार, श्री.रिंकु पवार, श्री.राहुल सैंदाणे, श्री.राहुल निकम हे सहभागी झाले .
“नायलॉन मांजा विक्रीवर जशी बंदी आहे, तशी त्याचा वापर करण्यावरही बंदी आहे. नायलॉन मांजा विक्री केल्यास पंतग विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल त्याचप्रमाणे नायलॉन मांजाचा वापर करणाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई करण्यात येईल त्यामुळे कुणीही नायलॉन मांजाचा वापर करुन नये व संक्राती सणाचा गोडवा आनंदात साजरा करावा असेही त्यांनी म्हटले आहे.